Twitter Engagements मध्ये विराट कोहली अव्वल, एमएस धोनी टॉप-5 मधून गायब; पाहा संपूर्ण लिस्ट
एमएस धोनी आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

सध्याच्या काळात क्रिकेटपटू ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया माध्यमांद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. क्रिकेट विश्वात सध्याचे युवा खेळाडू असोत किंवा जुन्या काळातील, सर्वांचे सोशल मीडियावर अकाउंट पाहायला मिळतात. मात्र, या सर्वांमध्ये भारताचा 'रनमशीन' म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीने (Virat Kohli) बाजी मारली आणि अव्वल स्थान पटकावलं. क्रिकेटच मैदान असो किंवा सोशल मीडिया, सर्व ठिकाणी विराट कोहलीचा बोलबाला असल्याचं दिसत आहे. सोशल मीडिया फार्म Twitteet च्या रिपोर्टनुसार यंदा ऑक्टोबर महिन्यात ट्विटरचा सर्वाधिक वापर करणारा विराट कोहली अव्वल क्रिकेटपटू ठरला. किंबहुना ट्विटरचा सर्वाधिक वापर करणारा तो भारतीयांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात विराट क्रिकेटपटूंमध्ये सर्वात सक्रिय दिसला. Twitteetच्या आकड्यानुसार विराटचे ऑक्टोबर महिन्यात 24, 65, 918 ट्विटर एंगेजमेंट्स होते.

Twitteetच्या अहवालानुसार या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या, काँग्रेस नेते राहुल गांधी दुसऱ्या तर विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. “विराट कोहलीने 2.4 लाख ट्विटर एंगेजमेंट्ससह पहिले स्थान मिळवले. सुरेश रैना 1.9 लाख ट्विटर इंगगमेंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे,” ट्विटने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले. “सचिन तेंडुलकर तिसऱ्या, हरभजन सिंह पाचव्या आणि वीरेंद्र सेहवाग सहाव्या स्थानावर आहेत. आकाश चोपडा, आता भाष्यकार देखील भरपूर लोकप्रिय आहे आणि ऑक्टोबरमध्ये ट्विटरवर 9.65 लाख इंगगमेंट्ससह चौथ्या स्थानावर आहे.”

विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी “8.1 लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स असूनही ऑक्टोबर महिन्यात ट्विटरवर पूर्णपणे निष्क्रिय होता.” भारतीय क्रिकेटपटूंबाहेर ऑलिम्पिक पदक विजेता व प्रो-बॉक्सर विजेंदर सिंहने गेल्या महिन्यात सर्वाधिक 4.27 लाख एंगेजमेंट्स नोंदविली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दुसरा क्रमांक 88 वर्षांच्या दादी चंद्रो तोमर या दिग्गज नेमबाजांनी घेतली. “सायना नेहवाल, बबिता फोगट आणि ज्वाला गुट्टा सारख्या सुपरस्टार्स मागे टाकत 2.84 ट्विटर एंगेजमेंट्ससह क्रिकेटच्या बाहेरील क्रीडा प्रकारात त्या दुसर्‍या क्रमांकावर होत्या,” प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले. अनुभवी पिस्तूल नेमबाज एक प्रशिक्षक आणि क्रीडा उत्साही आहे, ज्या उत्तर प्रदेशातील बागपत येथे ‘नेमबाज दादी’ म्हणून ओळखल्या जातात.