Virat Kohli इंस्टाग्रामवर 150 लाख फॉलोअर्सचा आकडा गाठणारा बनला पहिला आशियाई सेलिब्रिटी; पाहा कोण आहे टॉप-3
विराट कोहली(Photo Credit: PTI)

Virat Kohli Instagram Followers: मैदानावर एक रन-मशीन आणि सर्वात जास्त प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक, विराट कोहली (Virat Kohli) खरोखर यशस्वी खेळाडू आहे. मैदानावर मैलाचा दगड गाठण्याचा विराट कोहलीचा वेग मंदावला असला तरी भारतीय कर्णधाराने सोशल मीडियाच्या जगातले रेकॉर्ड तोडणे सुरूच ठेवले आहे. शुक्रवारी, कोहली इन्स्टाग्रामवर (Instagram) 150 लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडणारा पहिला क्रिकेटपटू, पहिला भारतीय तसेच पहिला आशियाई सेलिब्रिटी बनला. एकूण यादीत, फोटो-ब्लॉगिंग पोर्टलवर 150 लाखांचा टप्पा गाठणारा कोहली चौथा क्रीडा सेलिब्रिटी आहे. Hopper HQ च्या अहवालानुसार, इंस्टाग्रामद्वारे पैसे कमवण्याच्या बाबतीत कोहली हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रिटी आहे. सुपरस्टार क्रिकेटपटू प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक प्रायोजित पोस्टसाठी 5 कोटी रुपये घेतो. अशास्थितीत कोहलीने आता 150 लाखांचा टप्पा गाठल्याने प्रति पोस्ट किंमतही वाढण्याची शक्यता आहे. (IND vs ENG 4th Test Day 1: ओव्हल कसोटी Virat Kohli याचा धमाका, 2019 नंतर पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटमध्ये केला ‘हा’ कारनामा)

क्रीडा क्षेत्रात सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीकडे पहिले तर पहिल्या तीन जागांवर प्रसिद्ध फुटबॉलपटूंनी कब्जा केला आहे. पहिल्या स्थानावर पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो 337 लाख फॉलोअर्ससोबत सिंहासनावर बसला आहे. तर दुसऱ्या स्थानावर लिओनेल मेस्सी, 260 लाख आणि ब्राझीलचा नेमार 160 लाख फॉलोअर्ससोबत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. दरम्यान, विराटच्या तुलनेत, रोनाल्डो प्रत्येक प्रायोजित इन्स्टाग्राम पोस्टसाठी $ 1,604,000 (11.72 कोटी रुपये) शुल्क घेतो. इन्स्टाग्रामवरून सर्वाधिक पैसे कमवणाऱ्या क्रीडा सेलिब्रिटींच्या यादीत पुढे येणाऱ्या मेस्सीला इन्स्टाग्रामवर प्रति प्रायोजित पोस्ट $ 1,169,000 (8.54 कोटी रुपये) मिळतात. तसेच कोहलीच्या पुढे या यादीतील एकमेव अॅथलीट ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार प्रायोजित पोस्टने 824,000 डॉलर्स (6 कोटी रुपये) कमावतो.

दुसरीकडे, कोहली निःसंशयपणे जगातील सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू आहे. जरी केंद्रीय कराराद्वारे त्याची कमाई जगातील सर्वोत्तम नसली तरी प्रतिष्ठित फलंदाजाला इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) कडून 17 कोटी आणि बीसीसीआयकडून 7.5 कोटी रुपये मिळतात. याशिवाय कोहली काही उत्कृष्ट ब्रँड एंडोर्समेंट देखील करतो. यामध्ये ग्रेट लर्निंग, iQOO, Iqoo स्मार्टफोन, Lafarge, मॅक्स लाइफ इन्शुरन्स आणि Vizecare यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त तो कोलगेट, गूगल, हिरो, प्यूमा, विक्स इत्यादी ब्रॅण्ड्सचे समर्थन करत आहे आणि प्रत्येक करारासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे आकारतो.