IPL 2025: आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. आरसीबी (RCB)अजूनही त्यांच्या पहिल्या आयपीएल (IPL ) जेतेपदाच्या शोधात आहे. जो या वर्षी ट्रॉफी जिंकण्याच्या ध्येयाने मैदानात उतरेल. दरम्यान, विराट कोहलीसोबतचा अंडर-19 विश्वचषकातील एक खेळाडू तन्मय श्रीवास्तव (Tanmay Srivastava) इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंचाच्या भूमीकेत दिसणार आहे.

Virat Kohli's under-19 World Cup teammate lands umpiring job in IPL

Tanmay Srivastava is set to become the first to play as well as officiate in the IPL

READ: https://t.co/Togk9tzEQK #IPL #IPL2025 pic.twitter.com/uIRAq8BAk3
— TOI Sports (@toisports) March 19, 2025

तन्मय श्रीवास्तवचा क्रिकेटर ते पंच प्रवास
तन्मय श्रीवास्तवने सुमारे पाच वर्षांपूर्वी व्यावसायिक क्रिकेटला निरोप दिला होता. निवृत्तीनंतर, त्यांनी पंचाच्या भूमीकेत करिअर केले. लेव्हल 2 पंचिंग कोर्स पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे समर्पित केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंचाचा अनुभव घेतल्यानंतर, त्यांची आता आयपीएल 2025 साठी पंच म्हणून निवड झाली आहे.