आंतरराष्ट्रीय दौऱ्यांदरम्यान खेळाडूंसोबत त्यांच्या साथीदारांना राहता यावं - विराटची BCCI कडे विनंती
विराट कोहली -अनुष्का शर्मा (Photo Credits: Instagram)

विराट कोहलीने नुकतीचीच बीसीसीआयकडे आंतरराष्ट्रीय दौऱ्यांदरम्यान खेळाडूंच्या पत्नी/ गर्ल फ्रेंड्स यांना त्यांच्यासोबत राहता यावं या बाबत विनंती केली आहे. या वृत्ताला BCCI नेही दुजोरा दिला आहे. मात्र या मागणी वर तात्काळ उत्तर मिळणार नाही.कमिटी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन याबाबतचा निर्णय देईल.

सध्या खेळाडूंसोबत त्याच्या साथीदार केवळ ३ आठवडे राहू शकतात. पूर्वी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर खेळाडूं सोबत साथीदार उपस्थित राहू शकत नव्हता. विनोद राय आणि डायना एडुलजी यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टद्वारा नियुक्त कमिटी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन समिती या बाबतचा पुढील निर्णय घेणार आहे. यावर्ष अखेरीस भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.

 

काही महिन्यांपूर्वी भारत इंग्लंड दौऱ्यामध्ये आपण ४-१ अशी सीरिज हरलो होतो. त्या वेळेस अनेक खेळाडू त्यांच्या फॅमिली सोबत इंग्लंड मध्ये फिरत होते. अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. फॅन्सनीही खेळाडूंना ट्रोल केलं होतं.