Virat Kohli and Sachin Tendulkar | File Image | (Photo Credits- PTI)

2011 World Cup Final Anniversary: ‘धोनी फिनिशेस इन स्टाईल’ भारताने 28 वर्षाच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर वर्ल्ड कप (World Cup) 2011 जिंकून 11 आज वर्षे पूर्ण केली आहेत, पण आजही रवी शास्त्रीच्या कॉमेंट्रीतून हे शब्द एखाद्या चाहत्याने ऐकले तर शहारे उभे राहतात. 2011 मध्ये आजच्या दिवशी एमएस धोनीने नुवान कुलसेखरा याच्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने विजयी षटकार मारून 28 वर्षांनंतर भारताला विश्वचषक जिंकून दिला. या सामन्यात धोनीशिवाय गौतम गंभीर (Gautam Gamhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने (Sri Lanka) भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाने (Team India) वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर  (Sachin Tendulkar) यांच्या विकेट अवघ्या 31 धावांवर गमावल्या. सचिन बाद होताच भारतीय चाहत्यांनी सामना जिंकण्याची आशा जवळपास सोडली होती, पण त्यानंतर कोहलीने गंभीरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात कमबॅक करून दिले.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मोठ्या फायनलच्या रात्री श्रीलंकेविरुद्ध 275 धावांचा पाठलाग करताना तेव्हा 22 वर्षीय कोहलीच्या खांद्यावर मोठ्या अशांचा भार होता. 1983 ते 2011 दरम्यान भारताला विश्वचषकात अनेक धक्का बसले आणि कोहलीला चौथ्या क्रमांकावर पाठवून आणखी एक नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. लसिथ मलिंगा याने नवीन बॉलने कहर केल्यावर भारताची अवस्था 31/2 अशी झाली होती. 11 व्या वर्धापनदिनानिमित्त 2011 च्या संस्मरणीय विश्वचषक विजयाची आठवण करून विराट कोहलीने मैदानात जाताना ‘सचिन पाजी’कडून एक सल्ल्याचा शेअर केला. कोहलीने 35 धावा केल्या, ज्याला तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या म्हणतो. विराटने गौतम गंभीरसह 83 धावांच्या भागीदारीसह भारताचा डाव स्थिरावला आणि अखेरीस एमएस धोनी याच्या झंझावाती 79 चेंडूत 91 व गंभीरच्या 97 धावांनी विश्वचषक भारताच्या झोळीत पाडले.

"मला 2 बाद 20 धावांवर फलंदाजीला येतानाचे दडपण आठवते. सचिन आणि सेहवाग दोघेही बाद झाले. मी गेल्यावर सचिन पाजींनी मला म्हणाले 'भागीदारी करा. मी आणि गौतम गंभीरने भागीदारी केली व 90 धावा जोडल्या,” कोहलीने शनिवारी आरसीबीला सांगितले. “माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मौल्यवान 35 धावा. मला खूप आनंद झाला की मी संघाची गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा एक भाग होतो आणि मला जमेल तसे योगदान दिले.”