Virat Kohli Quizzes Anushka Sharma on Cricket: विराट कोहलीने अनुष्का शर्माला क्रिकेटविषयी 3 प्रश्न विचारले, पाहा ती पास की फेल (Watch Video)
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Photo Credits: Instagram)

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मुंबईतील आपल्या घरी या लॉकडाऊनमध्ये चांगला वेळ घालवताना दिसत आहे. टीम इंडियाचा (Team India) सतत दौरा आणि अनुष्काच शूटिंग यामुळे दोघांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. पण, लॉकडाऊनने ही उणीव भरून काढली आहे. या दरम्यान दोघांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले, मग तो विराटचा डायनासोर डान्स असो किंवा अनुष्कासाठी स्वतः बनवलेला केक या सर्वांबाबत विराट-अनुष्काने चाहत्यांना अपडेट दिल्या. आणि आता दोघांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला ज्यात दोघांमध्ये मैत्रीपूर्ण स्पर्धा पाहायला मिळाली. विरुष्का म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेले विराट आणि अनुष्का दोघांनाही अशा वेळी आपल्या चाहत्यांना कसे गुंतवून ठेवावे हे माहित असते. विराट-अनुष्काने बुधवारी एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये दोघे एकमेकांना काही प्रश्न विचारताना दिसले. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय खेळाडूची पत्नी असल्याने अनुष्काने क्रिकेटशी संबंधित प्रश्नांना कसा प्रतिसाद दिला हे पाहणे उत्सुकतेचे ठरले. (Virat Kohli-Anushka Sharma: विराट कोहली की अनुष्का शर्मा, कोण कोणाला सर्वात चांगल्या प्रकारे ओळखतो, इंस्टाग्राम स्पर्धेदरम्यान पॉवर कपलने दिली मजेदार उत्तरं Watch Video)

एक इशारा द्यायचा झाला तर अनुष्काने आपल्या उत्तरांनी यूजर्सना प्रभावित केले. विराटने सर्वात आधी प्रश्नसत्राची सुरुवात केली. त्याने सर्वात पहिले क्रिकेटच्या 3 नियमांबद्दल विचारले. यावर अनुष्का आधी हसत म्हणाली, "बाद होऊ नका, हार मनू नका... अजून बरेचसे आहेत, ते मला माहितेय. पॉवरप्लेमध्ये दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात... क्रीजबाहेर गोलंदाजी करू शकत नाही. आणि चेंडू सीमारेषेबाहेर गेल्या तो षटकार होतो." त्यानंतर विराटने अनुष्काला  महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाबद्दल विचारले ज्यावर तिने झुलन गोस्वामी असे बरोबर उत्तर दिले. विराटने अखेरीस होम ग्राउंड म्हणून कोणत्या मैदानाचा उल्लेख केला जातो? विचारले आणि अनुष्काने याचेही बरोबर उत्तर दिले. ती म्हणाली, "लॉर्ड्स."

इन्स्टाग्रामने (Instagram) त्यांच्या अधिकृत हँडलवर व्हिडिओ सामायिक केला आहे. व्हिडिओ सामायिक करताना, इंस्टाग्रामने लिहिले, " अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीसोबत #टेकब्रेक. ती एक अभिनेत्री (अनुष्का शर्मा) आहे. तो एक क्रिकेट खेळाडू (विराट कोहली) आहे. ते एक पॉवर कपल आहेत. मैत्रीपूर्ण स्पर्धेला संपूर्ण नवीन अर्थ देणाऱ्या या लव्हबर्ड्सबरोबर # टेकअब्रॅक करण्याची वेळ आली आहे. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि मोठ्याने हसण्यासाठी तयार व्हा."