विराट कोहलीने डिझाईन केले ट्रेंडी शूज ; इतकी आहे किंमत
विराटने डिझाईन केले बूट (Photo Credit : Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची एक वेगळी कला जगासमोर आली आहे. विराटने स्निकर हा बूटाचा प्रकार लॉन्च केला आहे. फक्त लॉन्च नाही तर हे बूट त्याने स्वतः डिझाईन केले आहेत. याची माहिती खुद्द विराटने ट्विट करुन दिली आहे.

या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, "100 टक्के क्लासिक, 100 टक्के मी! मी आज बास्केट क्लासिक वन 8 लॉन्च करत आहे. क्रिकेट आणि इतर कोणत्याही ठिकाणी वापरण्यासाठी हे बूट अतिशय उत्तम आहेत. मला हे भयंकर आवडले आहेत. तुम्हाला कसे वाटले? ते सांगा."

विराटने डिझाईन केले म्हणजे नक्कीच हे बूट अतिशय महाग असणार असे तुम्हाला वाटत असेल. पण या बूटांची किंमत आहे 5999 रुपये. फोटोत बूटांचा ट्रेंडी लूक पाहायला मिळतो.

स्निकर्सचे बॉलिवूडमधील अनेक स्टार्संना क्रेझ आहे. शाहरुख खान, करिना कपूर, जान्हवी कपूर यांचे स्निकर्स प्रेम अनेकदा दिसले आहे. त्याचबरोबर अभिनेत्री सोनम कपूरचा पती आनंद आहुजा देखील स्निकर्ससाठी क्रेझी आहे. लग्नात देखील त्याने सिल्व्हर रंगाचे स्निकर्स घातले होते.