Virat Kohli (Photo Credits: Twitter)

आबुधामी मध्ये रंगलेला IPL 2020 च्या 48 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) च्या टिमने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला (RCB) 5 विकेट ने पराभूत केले. यावेळी मैदानात काहीसा विचित्र प्रकार घडला आणि तो ही RCB चा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडून. मुंबई इंडियन्सचा कालच्या सामन्यात हिरो ठरलेला क्रिकेटर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने आपल्या तूफान फलंदाजी हा विजय MI च्या पारड्यात पाडला. यावेळी याच्या विजयावर विराट कोहली यांनी सूर्यकुमार यादव कडे पाहत त्याचे स्लेजिंग (शिव्या देऊन भडकवण्याच प्रयत्न) करताना दिसला. या प्रकाराने क्रिकेट प्रेमींनी या कृत्याची टिका केली असून नेटिजन्सने सोशल मिडियाच्या माध्यमातून विराटवर कडक शब्दांत टिका केली आहे.

नेटिशन्सने सोशल मिडियाच्या माध्यमातून विराट कोहलीवर टिका केली आहे. एखाद्या टीमच्या कर्णधाराचे हे कृत्य लज्जास्पद असून आम्ही याची निंदा करतो असे अनेक जण म्हणाले आहे. हेदेखील वाचा- MI vs RCB, IPL 2020: सूर्यकुमार यादवची एकाकी झुंज! मुंबई इंडियन्सने RCB वर 5 विकेटने केली मात

तर एकाने सूर्याने कोहलीविरुद्धची लढाई जिंकली असे म्हटले आहे.

या सामन्यात कोहलीने आमच्या मनातील त्याच्याविषयीची आदर गमावला आहे असेही काहीजण म्हणाले.

तर विराट कोहलीच्या चाहत्यांनी आम्ही तुझ्या सोबत आहोत असे सांगत ट्विट केले आहे.

मुंबई इंडियन्स संघाने RCB विरुद्धची ही मॅच 5 विकेटने जिंकली आहे. शिवाय मुंबई इंडियन्स टीम आता IPL 2020 टेबल पॉइंटमध्ये नंबर एक वर पोहोचली आहे.