![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/03/66-380x214.jpg)
Virat Kohli 10th Marksheet: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) ला शालेय जीवनात विद्यार्थी असताना किती गुण मिळाले याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? भारतीय रन-मशीन बनण्यापूर्वी विराटला गणित विषयाची थोडी कमी आवड होती. यापूर्वी कोहलीने स्वतः कबूल केले होते की, त्याने या विषयात उत्तीर्ण गुण मिळविण्यासाठी जितकी मेहनत केली तितकी त्याने क्रिकेटमध्ये कधीही केली नाही. विराटची 10 वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
विराट कोहलीने एक पोस्ट शेअर केली, ज्यानंतर इंटरनेटवर खळबळ उडाली. लोक विराटला मिळालेले मार्क पाहण्यासाठी उत्सूक आहेत. माजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कर्णधार विराट कोहलीने कू अॅपवर त्याच्या दहावीच्या मार्कशीटचा फोटो पोस्ट केला आहे. विराट कोहलीने सोशल नेटवर्किंग सेवेवर आपल्या पोस्टला कॅप्शन दिले, "तुमच्या मार्कशीटवर कमी असलेल्या गोष्टी तुमच्या कॅरेक्टरला अधिक कशा जोडतात हे मजेदार आहे." (हेही वाचा - IPL 2023: रोहित शर्मा कुठे आहे? IPL ने सर्व कर्णधारांचे ट्रॉफीसह फोटो शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न)
Virat Kohli's 10th class marksheet. pic.twitter.com/FNuCbUPsTB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 30, 2023
भारताचा माजी कर्णधार कोहलीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कोहलीने शेअर केलेलं मार्फशीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा-
विराट कोहलीने क्रिकेटमध्ये केलेल्या हजारो धावांना दहावीच्या गणिताच्या परीक्षेत मिळालेल्या कमी क्रमांकाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. कोहलीने हे PUMA च्या 'Let There Be Sport' मोहिमेचा एक भाग म्हणून मार्कशीटचा फोटो शेअर केला आहे. जेणेकरून नागरिकांमध्ये शिक्षण आणि पारंपारिक अभ्यासासोबतच खेळांचे महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण व्हावी. सोशल मीडियावर कोहलीच्या मार्कशीटचे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.