ICC ‘क्रिकेट हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश झाल्याबद्दल विनोद कांबळीने हटके स्टाईल मध्ये दिल्या सचिन तेंडुलकरला शुभेच्छा, पहा (Video)
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी (Photo Credit: Getty Images and Twitter)

क्रिकेटचा देव मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा आयसीसी (ICC) कडून गौरव करण्यात आला. आयसीसीने त्याचा 'क्रिकेट हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश केला आहे. आयसीसीकडून हा मान मिळणार सचिन सहावा भारतीय आहे. त्याच्यासह गुरुवारी दक्षिण आफ्रिकेचा अॅलन डोनाल्ड (Allan Donald) आणि ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू कॅथरीन फित्झपॅट्रीक यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. दरम्यान, ही बातमी कळताच क्रिकेट जगत आणि चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. याच दरम्यान, एका खास व्यक्तीने देखील सचिनचे कौतुक करत त्याचे अभिनंदन केले आहे. आणि ती व्यक्ती दुसरीकोणती नाही तर त्याचा बालमित्र आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) आहे. (ICC Hall Of Fame: सचिन तेंडुलकर, अॅलन डोनाल्ड, कॅथ्रीन फिट्जपॅट्रिक यांचा आयसीसीच्या ‘क्रिकेट हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश)

सचिनला शुभेच्छा देण्यासाठी विनोद कांबळी याने एक व्हिडिओ शेअर केला. यात कांबळी म्हणाला, "आयसीसीकडून आपल्याला हॉल ऑफ फेममध्ये सन्मान मिळाल्याबद्दल मास्टर ब्लास्टर तुमचे अभिनंदन. मास्टर जेव्हा मी तुमचा लहानपणीचा बॅट हातात घेऊन असतानाचा फोटो पहिला आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग केला. मी खूप खुश आहे. आणि हॉल ऑफ फेममध्ये येण्यासाठी मोठा ह्ग. माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत आहे आणि मी हेच बोलू शकतो की, तुझा मित्र नेहमी तुझ्यावर प्रेम करतो. तुला सलाम. तू एक लेजेंड आहे. तू एक खरा मास्टर ब्लास्टर आहे."

तेंडुलकर आणि कांबळी हे भारतीय क्रिकेट जगतमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात एकत्रच केली होती. दोघे दिवंगत रमाकांत आचरेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्यानंतर ते शारदाश्रम शाळेकडून खेळले होते. पुढे मुंबई आणि भारतीय संघामध्येही ते एकत्र खेळले.