Vinesh Phogat (Photo Credit - X)

Year in Search 2024: 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या भारतीयांच्या यादीत स्पोर्ट्स खेळाडूचे वर्चस्व होते. या यादीत ना कोणी राजकारणी, ना कोणी चित्रपट स्टार किंवा कोणी उद्योगपती पहिल्या क्रमांकावर राहिला नाही. यादरम्यान, महिला कुस्तीपटू विनेश फोगट सर्वाधिक सर्च केलेल्या भारतीयांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. विनेशने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी वजनाच्या समस्येमुळे ती अपात्र ठरली. (हे देखील वाचा: Google Year in Search 2024 in India: गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेला टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना, पाहा टॉप 5 मॅचची यादी)

हार्दिक पांड्याने दुसऱ्या स्थानावर

खेळाडूंच्या बाबतीत भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. हार्दिकने यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवले आणि 2024 चा टी-20 विश्वचषक भारताला जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय फलंदाज शशांक सिंग आणि अभिषेक शर्मा यांनाही गुगलवर खूप सर्च करण्यात आले. बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनही दहाव्या क्रमांकावर आहे. टॉप 10 मध्ये राजकारणी नितीश कुमार आणि चिराग पासवान, अभिनेता पवन कल्याण, पूनम पांडे आणि राधिका मर्चंट यांचा समावेश आहे.

या नावांचा टॉप 10 मध्ये समावेश

विनेश फोगट

नितीश कुमार

चिराग पासवान

हार्दिक पंड्या

पवन कल्याण

शशांक सिंग

पूनम पांडे

राधिका मर्चंट

अभिषेक शर्मा

लक्ष्य सेन

इंडियन प्रीमियर लीग टाॅपवर

2024 मध्ये खेळाशी संबंधित सर्वाधिक ट्रेंडिंग शोध इंडियन प्रीमियर लीग आणि टी-20 विश्वचषक होते. या दोन्ही कार्यक्रमांना भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याच वेळी, पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांमध्ये पाचवे स्थान मिळाले.