Vijay Hazare Trophy मधून पंजाब संघ बाहेर पडल्यानंतर हरभजन सिंह, युवराज सिंह यांनी BCCI वर केली टीका, हे आहे कारण
हरभजन सिंह, युवराज सिंह (Photo Credit: Facebook)

तमिळनाडू-पंजाब यांच्यातील आणि गतविजेत्या मुंबई आणि छत्तीसगड संघातील विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) क्वार्टर फायनलचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी, ग्रुप स्टेजमध्ये उत्तम कामगिरीच्या जोरावर तामिळनाडू आणि छत्तीसगड संघाला सेमीफायनलमध्ये स्थान देण्यात आले. ग्रुप लीगमध्ये तमिळनाडूने (Tamil Nadu) सर्व नऊ, तर पंजाबने (Punjab) आठपैकी पाच सामने जिंकले. दुसरीकडे, पावसाने व्यत्यय आणल्यामुळे पंजाब आणि मुंबई (Mumbai) संघाला खेळ न खेळतच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यामुळे, दोन्ही संघाच्या खेळाडूंसह चाहत्यांचीही मात्र निराशा झाली. पहिले फलंदाजी करणार्‍या तामिळनाडू संघाने निर्धारित 39 ओव्हरमध्ये 174 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाबने चांगली सुरुवात करत 52 धावांत 2 गडी गमावले. त्यानंतर पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. यांच्यानंतर पंजाब संघाचा कर्णधार मनदीप सिंह (Mandeep Singh) याने ट्विटरवर पोस्ट शेअर करत निराशा व्यक्त केली. (विजय हजारे ट्रॉफीमध्ये 17 वर्षीय मुंबईच्या यशस्वी जयस्वाल याचा डबल धमाका, झारखंड संघाविरुद्ध केले शानदार दुहेरी शतक)

मनदीपने लिहिले की, "लीगच्या टप्प्यात अत्यंत कठीण ए/बी गटात उत्कृष्ट क्रिकेट खेळला आणि शानदार बाद प्रदर्शन करतक्वार्टर गाठले. आणि आता पावसामुळे क्वार्टर फायनल न खेळता आम्ही स्पर्धेतून बाहेर पडलो आहोत."मनदीपच्या या ट्विटवर टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने प्रतिक्रीया देत स्पर्धेत राखीव दिवस का नाही असा प्रश्न उपस्थित केला. भज्जीने लिहिले, "या स्पर्धांमध्ये राखीव दिन का नाही... बीसीसीआयने त्याबद्दल विचार करून बदल करावा." भज्जी शिवाय, माजी सिक्सर किंग युवराज सिंह (Yuvraj Singh) यानेही राखीव दिवस न ठेवण्यामागील युक्तिवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि लिहिले, "विजय हजारे स्पर्धेत पंजाबचा तामिळनाडू विरुद्ध पुन्हा एकदा दुर्दैवी निकाल लागला, पुन्हा पंजाब हरला आणि खराब हवामानामुळे खेळ थांबवण्यात आला. आणि मुख्य म्हणजे आम्ही सेमीफायनलमध्ये पोहचलो नाही! आपल्याकडे राखीव दिवस का नाही? की ही घरगुती स्पर्धा आहे म्हणून खरोखर काही फरक पडत नाही?"

हरभजन सिंह

युवराज सिंह

पंजाब संघाचे 22 गुण होते तर तामिळनाडूचे 28 गुण होते. याच्या आधारावर तामिळनाडू संघाने सेमीफाइनल फेरी गाठली आहे. याच क्रमात आता 23 ऑक्टोबरला पंजाब आणि गुजरात यांच्यात सेमीफायनल सामना खेळला जाईल. दुसरीकडे, कर्णधार कर्णधार हरप्रीत सिंह आणि अमनदीप खरे यांच्या अर्धशतकाच्या खेळीमुळे मुंबई विरुद्ध छत्तीसगडने 45.4 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 190 धावा केल्या. यानंतर व्हीजेडी पद्धतीने जिंकण्यासाठी मुंबईला 40 षटकांत 192 धावांचे लक्ष्य देण्यात आले. यांच्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि आदित्य तरे यांनी 11.3 ओव्हरमध्ये पहिल्या विकेटसाठी 95 धावांची अतूट भागीदारी केली. यादरम्यान पुन्हा पाऊस आला आणि त्याच्यानंतर सामना होऊ शकला नाही.