भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium in Ahmedabad) खेळवला जाणार आहे. भारतासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. हा सामना जिंकल्यानंतर भारत 3-1 ने मालिका आपल्या नावावर करेल आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही आपले स्थान निश्चित करेल. हा सामना गमावल्यानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी नशिबावर अवलंबून असेल. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने सहज जिंकले. त्याचवेळी तिसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत चौथा विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला सर्वस्व पणाला लावायचे आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवार, 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तसेच भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. नाणेफेक सकाळी 9 वाजता होईल. (हे देखील वाचा: चौथ्या कसोटीपूर्वी माजी प्रशिक्षकाच्या वक्तव्यावर Rohit Sharma संतापला, म्हणाला 'हे सर्व बकवास आहे')
सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता. भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.
लाइव्ह मॅच मोफत कशी बघायची?
जिओ टीव्हीवर तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. तुमच्या घरी टाटा स्काय कनेक्शन असल्यास, तुम्ही टाटा प्ले अॅपवरही सामना पाहू शकता. यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क देखील लागणार नाही.