अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने (AAHL) जागतिक विमानतळ लाउंज अॅक्सेस सेवा प्रदात्या चिनी कंपनी ड्रॅगनपाससोबतची भागीदारी तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणली आहे. या निर्णयामुळे, ड्रॅगनपास सदस्यांना यापुढे अदानी समूहाद्वारे व्यवस्थापित मुंबई, अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम या विमानतळांवर लाउंज प्रवेश मिळू शकणार नाही. ‘ड्रॅगनपाससोबतची आमची भागीदारी तात्काळ संपुष्टात आली आहे. त्यांचे ग्राहक आता अदानी विमानतळांवर लाउंज अॅक्सेससाठी पात्र राहणार नाहीत’, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र कंपनीने सांगितले आहे की, या बदलाचा इतर लाउंज सेवा किंवा बँका आणि क्रेडिट कार्डद्वारे प्रदान केलेल्या सेवांवर परिणाम होणार नाही. इतर भागीदारांमार्फत लाउंज सेवा जशा आहेत तशाच राहतील. या आठवड्याच्या सुरुवातीला, अदानी डिजिटल लॅब्स (ADL) ने ड्रॅगनपास सोबत एक धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली होती, ज्याचा उद्देश विमानतळांवर चांगला लाउंज अनुभव प्रदान करणे आहे. पण ही भागीदारी काही दिवसांतच संपुष्टात आली आहे.

दरम्यान, दिल्ली विमानतळानेही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तुर्की ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबी एव्हिएशनसोबतचा करार रद्द केला आहे. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) ने सुरक्षा मंजुरी रद्द केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. तुर्कीयेचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेमुळे भारताने हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: Jamia Millia Islamia Suspends MoUs With Turkey: राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जेएनयुनंतर आता जामिया मिलिया इस्लामियानेही रद्द केले तुर्कीसोबतचे सामंजस्य करार)

Adani Airports Ends Partnership With DragonPass: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)