
सध्या देशभरात 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कठीण दिवस सुरू आहेत. कोणाला कमी गुण मिळाल्याने बोल एकावे लागत आहे. कुणी नापास झाल्याने निराश आहे. यातून सेलिब्रिटी विद्यार्थ्यीही काय सुटलेले नाहीत. 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होताच सर्वांच्या नजरा आयपीएल (IPL) स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी(Vaibhav Suryavanshi)च्या निकालावर लागल्या आहेत. सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीच्या निकालाचीही बातमी आहे, ज्यामध्ये तो परीक्षेत नापास झाल्याचं सांगितलं जात आहे. तो खरच नापास झालाय की ही अफवा आहे? चला जाणून घेऊयात.
वैभव सूर्यवंशी बोर्ड परीक्षेत नापास झाला?
सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीच्या नापास होण्याच्या बातमीची जेव्हा पडताळणी केली, तेव्हा आम्हाला आढळला नाही. म्हणजे, वैभव सूर्यवंशी बोर्ड परीक्षेत पास झाला असेल असे तुम्हाला वाटल असेल. पण तसंही नाही. कारण, पास आणि नापासचा प्रश्न तेव्हा येईल जेव्हा तो परीक्षेला बसलेला असेल. त्याने ती परिक्षाच दिलेली नाही.
View this post on Instagram
सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीच्या 10वीच्या बोर्ड परीक्षेत नापास होण्याबाबत बातमी आली. ज्यात लिहिलं आहे की 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी 10वीच्या CBSE बोर्ड परीक्षेत नापास झाल्यानंतर BCCI ने त्याच्या उत्तरपत्रिकेची DRS पद्धतीने पुनरावलोकन करण्याची विनंती केली आहे. मात्र, वैभव सूर्यवंशी सध्या 10वीचा विद्यार्थी नाही. तो 9वी इयत्तेत शिकत आहे. म्हणजे तो पुढच्या वर्षी बोर्डाची परीक्षा देईल.