
Varun Chakaravarthy Record: भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने रविवारी न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy 2025) पदार्पणाच्या सामन्यात शानदार कामगिरी करून एक खास विक्रम आपल्या नावावर केला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात वरुण आता भारताकडून सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज बनला आहे. त्याने किवी संघाविरुद्ध डावाची सुरुवात करताना 42 धावा दिल्या आणि पाच विकेट्स घेतल्या.
त्याच्या अचूक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडचे फलंदाज चांगलेच अडचणीत आले होते. ज्यामुळे तो किवींविरुद्ध भारताच्या फिरकी हल्ल्यात एक महत्त्वाचा गोलंदाज ठरला. या गूढ फिरकी गोलंदाजाला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले आहे.
वरुण चक्रवर्तीची शानदार कामगिरी
🚨 VARUN CHAKRAVARTHY HAS THE BEST BOWLING FIGURES FOR INDIA ON CHAMPIONS TROPHY DEBUT. 🚨 pic.twitter.com/25MX6IZWjb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 2, 2025
हर्षितची जागा वरुणने घेतली
बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वरुणचा संघात समावेश नव्हता. परंतु किवीजविरुद्ध त्याने हर्षित राणाऐवजी संघात स्थान मिळवले. वरुणच्या प्रवेशाबरोबरच चार फिरकीपटू टीम इंडियाच्या गोलंदाजी हल्ल्यात सामील झाले.
वरुणने गोलंदाजीबद्दल काय म्हटले?
तो म्हणाला, 'सर्वप्रथम, मी सुरुवातीला घाबरलो होतो. मी भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फारसे सामने खेळलेले नाहीत. पण जसजसा खेळ पुढे सरकू लागला तसतसे मला धिर येत गेला. विराट, रोहित, श्रेयस आणि हार्दिक माझ्याशी बोलत होते आणि त्यामुळे मला मदत झाली. मी भारतासाठी खेळण्यास नक्कीच उत्सुक होतो. पण दुसरीकडे मी घाबरलोही होतो. दुबईची खेळपट्टी पूर्णपणे फिरकी देणारी नव्हती. पण, जर योग्य ठिकाणी गोलंदाजी केली तर ती मदत करते. कुलदीप, जड्डू आणि अक्षर यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाजांनीही गोलंदाजी केली, ते पूर्णपणे सांघिक प्रयत्न होते.