OPERATION SINDOOR | Photo Credits: Piyush Goyel

Operation Sindoor: भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ले केले. नऊ वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 80 अतिरेक्यांना यशस्वीरित्या निष्क्रिय केले. या समन्वित कारवाईला क्रिकेट विश्वातून व्यापक पाठिंबा मिळाला. ज्यामध्ये सध्याचे आणि माजी दोन्ही भारतीय खेळाडू सशस्त्र दलांचे कौतुक करण्यासाठी एकत्र आले. क्षेपणास्त्र हल्ले केले. 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) च्या माध्यमातून घेतला आहे. भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद मध्ये 9 ठिकाणांवर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उदवस्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीमध्ये भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना आपलं लक्ष्य केले आहे. रात्री 1 वाजून 44 मिनिटांनी हे हल्ले करण्यात आले आहेत.

दरम्यान यामध्ये नागरिक किंवा पाकिस्तानी सैन्यदलावर कोणताही हल्ला झालेला नाही. 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून बहावलपूर,मुरिदके,गुलपूर,भीमबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुजफ्फराबाद मध्ये हा हल्ला करण्यात आला आहे.