USA vs SA (Photo Credit - X)

SA vs USA T20 WC 2024 Supe-8: एडन मार्करामचा नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघ बुधवारी (19 जून) टी-20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या सुपर 8 सामन्यात (T20 World Cup 2024) मोनांक पटेलच्या नेतृत्वाखालील अमेरिकन संघाशी (SA vs USA) भिडणार आहे. सुपर-8 च्या गट 2 मध्ये समाविष्ट असलेल्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या फेरीत ड गटात अव्वल स्थान पटकावले होते. दुसरीकडे, अ गटात भारतानंतर अमेरिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानला हरवून त्यांनी सुपर-8 चे तिकीट मिळवले होते. टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, या सामन्याचा आनंद घेण्यासाठी चाहत्यांना कुठे सामना पाहावा लागणार आहे या लेखाद्वारे आपण जाणून घेवूया..

कधी अन् कुठे होणार सामना?

टी-20 विश्वचषक 2024 सुपर-8 मध्ये, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना आज सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा येथे भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाणार आहे.

टीव्हीवर सामना कुठे प्रसारित केला जाईल?

भारतात, टी-20 विश्वचषक 2024 सुपर-8 मध्ये अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणारा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल. (हे देखील वाचा: T20 World Cup 2024 Super-8 Schedule: टी-20 वर्ल्डकपच्या सुपर-8 मध्ये कधी कुठे अन् कोणत्या संघासोबत होणार सामना? जाणून घ्या सुपर-8 चे संपूर्ण वेळापत्रक)

मोबाईलवर 'फ्री' लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार?

डिस्ने प्लस हॉटस्टारवर अमेरिका आणि दक्षिण यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'फ्री' असेल. तथापि, केवळ मोबाइल वापरकर्ते विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतील.

टी-20 विश्वचषकासाठी दोन्ही संघ

दक्षिण आफ्रिका संघ: रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडम मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, ओटनील बार्टमन, तबरेझ शम्सी, केशव महाराज, ब्योर्न फॉर्च्युइन रायन रिकेल्टन, जेराल्ड कोएत्झी

अमेरिकेचा संघ: शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शेडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान, नॉथुश केंजिगे, मोनांक पटेल, निसर्ग पटेल, मिलिंद कुमार