Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयाचा हिरो ठरला सूर्यकुमार यादव (Surya Kmar Yadav). सूर्याने या सामन्यात नाबाद 112 धावांची जबरदस्त खेळी केली. सूर्याचे हे अवघ्या 5 महिन्यांतील तिसरे टी-20 शतक होते. सूर्याने आपल्या दमदार फलंदाजीने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. मात्र, या खेळाडूची ताकद आतापर्यंत इतर कोणत्याही फॉरमॅटमध्ये दिसलेली नाही. त्यामुळे भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आता या खेळाडूला कसोटीतही संधी देण्याची चर्चा आहे. सूर्यकुमार यादवने जेव्हापासून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हापासून खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याच्या शानदार फॉर्मचे कौतुक केले जात आहे.
गंभीरने इन्स्टावर केली पोस्ट
श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम टी-20 सामन्यात सूर्याच्या पराक्रमानंतर, 2011 चा विश्वचषक विजेता फलंदाज गंभीरने 32 वर्षीय खेळाडूसाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची वेळ आली आहे, असे धाडसी विधान केले. गंभीरने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, सूर्य कुमारचा कसोटी क्रिकेटमध्ये दरानुसार समावेश करण्याची वेळ आली आहे. (हे देखील वाचा: IND vs SL: सूर्यकुमार यादवने बाबर आझम आणि लोकेश राहुलला टाकले मागे, नावावर केला 'हा' नवीन विक्रम)
टीम इंडियाने जिंकली मालिका
भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामना शनिवारी राजकोटमध्ये खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 91 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 5 विकेट गमावून 229 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ अवघ्या 137 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्याचा हिरो ठरला सूर्यकुमार यादव ज्याने 112 धावांची शानदार खेळी केली. याच गोलंदाजीत अर्शदीप सिंहने 3 बळी घेतले. या मालिकेतील पहिल्या सामन्यात चुरशीच्या लढतीनंतर टीम इंडियाने 2 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने 16 धावांनी विजय मिळवला.