श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात (IND vs SL) सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) शानदार शतक झळकावले. एका वर्षातच त्याने भारतासाठी तिसऱ्यांदा T20 क्रिकेटमध्ये शतक झळकावले आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सूर्याचे हे तिसरे शतक होते. या खेळीने त्याने भारताच्या लोकेश राहुल आणि पाकिस्तानच्या बाबर आझमसह अनेक फलंदाजांना मागे टाकले आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. तर, सूर्यकुमार यादवने हा पराक्रम तीनदा केला आहे. आता फक्त भारतीय कर्णधार रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात सूर्यकुमारच्या पुढे आहे.
रोहितने भारतासाठी T20 मध्ये चार शतके झळकावली आहेत आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तो फलंदाज आहे. सूर्यकुमार मॅक्सवेल आणि मुनरोच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. झेक प्रजासत्ताकच्या द्विजीनेही आपल्या देशासाठी टी-20 मध्ये तीन शतके झळकावली आहेत, परंतु तो सहयोगी संघाचा भाग आहे. हेही वाचा IND vs SL 3rd T20: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 91 धावांनी उडवला धुव्वा, मालिका 2-1 ने घातली खिशात