भारत अंडर-19 संघ  (Photo Credit: Twitter)

दक्षिण आफ्रिकेत जाहीर झालेल्या अंडर-19 विश्वचषकचा (World Cup) पहिला सेमीफायनल आज भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहेल नजीर (Rohail Nazir) पाकिस्तानचे, तर प्रियम गर्ग (Priyam Garg) भारताचे नेतृत्व करत आहे. चार वेळा चॅम्पियन असणारा भारतीय संघ सलग तिसर्‍रा अंतिम सामना खेळण्यास इच्छूक असेल, तर पाकिस्तानचा कर्णधार नजीर संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आजच्या या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये मागील सामन्यातून कोणताही बदल झाला नाही आहे. भारत-पाकिस्तानमध्ये आजचा सेमीफायनल सामना अंडर-19 विश्वचषक 2018च्या आवृत्तीच्या उपांत्य फेरीची पुनरावृत्ती असेल. त्यावेळी, पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारत अंडर-19 ने सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला 203 धावांनी पराभूत करत फायनल गाठले होते. (IND vs PAK U19 World Cup 2020 Semi-Final Live Streaming: भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 वर्ल्ड कप लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports वर)

दरम्यान, सेमीफाइनलपर्यंत दोन्ही संघ अपराजित राहिले आहे. दोन्ही संघाने क्वार्टर फायनलसोबत सर्व सामने जिंकले. पाकिस्तानचा एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आजच्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडिया 7 व्यांदा अंडर-19 विश्वचषकचे फायनल गाठण्याचे प्रयत्न करेल.

अंडर-19 विश्वचषक सेमीफायनलसाठी असा आहे भारत-पाकिस्तानचा प्लेयिंग इलेव्हन

पाकिस्तानः हैदर अली, मोहम्मद हुरैरा, रोहेल नजीर (कर्णधार, यष्टीरक्षक), फहाद मुनीर, कासिम अक्रम, मोहम्मद हरीस, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, ताहिर हुसेन, आमिर अली, मोहम्मद अमीर खान.

भारतः यशस्वी जयस्वाल, दिव्यांश सक्सेना, टिळक वर्मा, प्रियांम गर्ग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), सिद्धेश वीर, अथर्व आकोलेकर, रवी बिश्नोई, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, आकाश सिंह.