भारत विरुद्ध अफगाणिस्तान U-19 आशिया कप (Photo Credit: Twitter/BCCI)

शारजाह (Sharjah) येथे मंगळवारी दोन अधिकार्‍यांच्या कोविड-19 संसर्गाच्या अहवालांमुळे बांगलादेश (Bangladesh) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांचा समावेश असलेला निर्णायक गट सामना रद्द करण्यात आला. यानंतर आता अंडर-19 आशिया चषक (U91 Asia Cup) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. हा सामना गुरुवारी खेळला जाईल. दोन अधिकार्‍यांच्या कोविड-19 पॉझिटिव्ह निकालामुळे स्पर्धेतील बी गटातील अंतिम सामना रद्द होण्यापूर्वीच तब्बल 32.4 षटकांचा खेळ खेळण्यात आला. श्रीलंकेने टॉस जिंकून बांगलादेशला फलंदाजीला बोलावल्यावर अरिफुल इस्लाम (19) आणि मोहम्मद फहिम (27) फलंदाजीला आले. सामना रद्द झाला तेव्हा बांगलादेशच्या 32.4 षटकांत 4 बाद 130 धावा होत्या. (U-19 Asia Cup: अफगाणिस्तानवर 4 विकेट्सने मात करत टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक)

“आशियाई क्रिकेट परिषद आणि अमिराती क्रिकेट बोर्ड हे पुष्टी करू शकत आहेत की ACC अंडर 19 आशिया चषक स्पर्धेचा आज होणारा अंतिम गट बी सामना रद्द करण्यात आला आहे,” आशियाई क्रिकेट परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे. “दोन अधिकार्‍यांची कोविड-19 साठी चाचणी पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी झाली आहे. अधिकारी सध्या सुरक्षित आहेत आणि टूर्नामेंट प्रोटोकॉलनुसार उपचार केले जात आहेत. या सामन्याशी संबंधित सर्व कर्मचारी चाचणी प्रोटोकॉलमधून जात आहेत आणि निकाल येईपर्यंत त्यांना वेगळे केले जात आहे,” निवेदनात पुढे म्हटले आहे. लक्षात घ्यायचे की बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही संघ उपांत्य फेरीसाठी आधीच पात्र ठरले होते आणि हा सामना गट विजेता व उपविजेता ठरणार होता. त्याच्या उत्कृष्ट नेट रनरेटमुळे बांगलादेश गटात अव्वल स्थानावर राहिला आणि 30 डिसेंबर रोजी उपांत्य फेरीत त्यांचा सामान भारताशी होईल.

दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंकेचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. 2000, 2008, 2012 आणि 2018 या चार वेळा विजेतेपद पटकावणारा भारत स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. भारत 2016 मध्ये आणि न्यूझीलंड येथे 2020 मध्ये झालेल्या स्पर्धेच्या मागील आवृत्तीतही उपविजेता ठरला आहे.