राशिद खान (Photo Credit: Getty)

2015 मध्ये राशिद खान (Rashid Khan) आंतरराष्ट्रीय सीनवर उदयास आला आणि काही वेळातच तो अव्वल दर्जाचा आंतरराष्ट्रीय फिरकी गोलंदाज बनला. आपली वेगवान, गुगली आणि भिन्नता एकत्र करून रशीदने पटकन जगातील सर्वोत्कृष्ट बनण्याचा आपला मार्ग शोधला. युवा राशीदने अफगाणिस्तान क्रिकेटला (Afghanistan Cricket) नवीन उंचीवर नेले आणि देशातील अनेक क्रिकेट चाहत्यांचा आवडता खेळाडू बनला आहे. राशिद 21 वर्षाचा हँडसम बॅचलर आहे. इंडियन प्रीमिअर लीगमुळे राशिदच्या चाहत्यावर्गात तरूणींचीही भर पडली, त्यामुळे तो आता विवाहबंधनात केव्हा अडकणार? यासंबंधीचा प्रश्न राशिदला अनेकदा प्रश्न विचारले गेले आहे. नुकतेच आझादी रेडियोच्या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर राशिद म्हणाला, “मी आता माझ्या लग्नाचा विचार करणार नाही. अफगाणिस्तानचा संघ जेव्हा वर्ल्ड कप (World Cup) जिंकेल, तेव्हाच मी साखरपुडा आणि लग्न करेन”, अशी प्रतिक्रिया राशिदने दिले. मात्र यामुळेच आत तो ट्रोल होत आहे. ('तू माझं घर होतीस आई'! आईच्या निधनाने अफगाणिस्तानाचा स्टार राशिद खान भावुक)

राशिदच्या संभाव्य आणि गोलंदाजीच्या कौशल्याबद्दल कुणालाच शंका नाही पण अफगाणिस्तान विश्वचषक जिंकल्यानंतर लग्न केल्याबद्दलच्या त्यांच्या टिप्पणीमुळे त्याच्या बऱ्याच चाहत्यांना हसू फुटले. बऱ्याच चाहत्यांनी त्याच्या वक्तव्याबद्दल राशिदला ‘सलमान खानचा चाहता’ असे म्हणूनही संबोधले.

पाहा यूजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया:

"बॅचलर स्टॅच्यू"

लग्नापासून पळून जाण्याची भन्नाट योजना

तू रशीद खान आहेस .. सलमान खान नाही

नवीन सलमान खान

राशिद खान

आयसीसी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत राशिद सध्या क्रमांकावर आहे. 7 कसोटी, 67 वनडे आणि 48 टी-20 सामन्यांच्या कारकीर्दीत राशिदने आजवर अफगाणिस्तानकडून अनुक्रमे 23, 133 आणि 89 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने अखेरीस आयर्लंडविरुद्ध टी-20 सामना खेळला. राशिदच्या वेगवान गोलंदाजीने त्याला आयपीएल कराराची संधी मिळवून दिली आणि सनरायझर्स हैदराबाद जर्सीमध्ये तो भारतीय भूमीवरही चमकला. आयपीएल कारकिर्दीतील 46 सामन्यांमध्ये राशिदने 55 गडी बाद केले आहेत.