England National Cricket Team vs Australia National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना 29 सप्टेंबर रोजी ब्रिस्टल येथील काऊंटी मैदानावर होणार आहे. दुपारी 3.30 वाजता सामना खेळवला जाईल. चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाने शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा 186 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. आता निर्णायक सामना जिंकून मालिका जिंकून दोन्ही संघांना आपली सर्वोत्तम कामगिरी करायची आहे.
हेड टू हेड रेकाॅर्ड (ENG vs AUS Head to Head Record)
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 159 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाने 90 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 64 सामने जिंकले आहेत. या कालावधीत दोन सामने टाय झाले आहेत, तर तीन सामन्यांचा निकाल लागलेला नाही. इंग्लंडच्या भूमीवर दोन्ही संघांमध्ये 76 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाने 35 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 37 सामने जिंकले आहेत. तर 2 सामने टाय झाले असून 2चा निकाल लागला नाही.
Everything on the line ‼️
The exciting #ENGvAUS ODI series reaches its climax 🔥
Who will lift the trophy? 🏆
Watch the 5⃣th ODI, LIVE on #SonyLIV 📲 pic.twitter.com/F9knBERPnT
— Sony LIV (@SonyLIV) September 28, 2024
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पाचव्या वनडेसाठी प्रमुख खेळाडू (Key Players): हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मिचेल मार्श, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, हे असे काही खेळाडू आहेत ज्यांना सामन्याचा मार्ग कसा बदलायचा हे माहित आहे.
मिनी बॅटलमध्ये एकमेकांना अडचणीत आणणारे खेळाडू (Mini Battle): इंग्लंडचा स्टार फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन आणि मिचेल स्टार्क यांच्यातील सामना रोमांचक होऊ शकतो. त्याचबरोबर ट्रॅव्हिस हेड आणि मॅथ्यू पॉट्स यांच्यातील संघर्षाचाही या सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. दोन्ही संघांमध्ये अनेक प्रभावी युवा खेळाडूंसह संतुलित फळी आहे.
हे देखील वाचा: England vs Australia 5th ODI 2024 Pitch Report: फलंदाज की गोलंदाज; ब्रिस्टलमध्येमध्ये कुणाची जादू चालणार? वाचा पिच रिपोर्ट
किती वाजता सुरु होणार सामना?
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 29 सप्टेंबर रोजी ब्रिस्टल येथील काऊंटी स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 3.30 वाजता सुरू होईल. तर टॉसची वेळ अर्धा तास आधी असेल.
कुठे पाहणार सामना?
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहू शकता. हेच प्रसारण आपण सोनी स्पोर्ट्स टेन 5 एसडी/एचडी वरही पाहू शकता. तसेच सोनी लिव (SonyLiv) आणि फैनकोड ऐप और वेबसाइट यांवरही आपण या सामन्यांचा आनंद घेऊ शकता.
पाहा दोन्ही संघाचे खेळाडू
इंग्लंड एकदिवसीय संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (विकेट-कीपर), बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट (विकेट-कीपर), जेमी स्मिथ (विकेट-कीपर), ऑली स्टोन, रीस टोपली, जॉन टर्नर
ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ: मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी (विकेट-कीपर), कूपर कोनोली, बेन द्वारशिस, कॅमेरॉन ग्रीन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस (विकेट-कीपर), ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा