Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 65 धावांनी (IND vs NZ) पराभव केला. यासह भारतीय संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा चौथा विजय आहे. या विजयानंतर हार्दिकने मोठं वक्तव्य केलं असून संघाच्या कामगिरीवरही तो उघडपणे बोलला आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 217.65 च्या स्ट्राईक रेटने 11 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 111 धावा केल्या. त्याने 49 चेंडूत दुसरे टी-20 शतक झळकावले. त्याने भारताला 20 षटकांत 191/6 असे आव्हानात्मक लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 18.5 षटकांत सर्वबाद 126 धावांवर आटोपला.

फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही केला चमत्कार

दीपक हुडाने 19 व्या षटकात तीन विकेट्ससह एकूण चार बळी घेतले, तर युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमारनेही एक विकेट घेतली. सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सोहळ्यात हार्दिक म्हणाला, "अष्टपैलू कामगिरी, यापेक्षा चांगली कामगिरी होऊ शकत नाही. सूर्यकुमारने आम्हाला आणखी 30 धावा दिल्या. त्यानंतर गोलंदाज चमकदार होते. आक्रमक असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक चेंडूवर मारा केला पाहिजे." तो पुढे म्हणाला, सगळ्यांची चांगली उत्कृष्ट कामगिरी होती. गोलंदाजी करणे कठीण होते, परंतु ते त्यांच्या योजनांवर ठाम राहिले. (हे देखील वाचा: IND vs NZ T20I 2022: संजू सॅमसनला पुन्हा संघात स्थान नाही, उमरान मलिकही बाहेर; सोशल मीडियावर गोंधळ)

हुडाच्या कामगिरीवर कर्णधार खूश

हार्दिकने सामन्यात गोलंदाजी केली नाही, कारण हुड्डा चांगली गोलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव संपवला. आणखी खेळाडूंना चांगली गोलंदाजी करताना पाहायला आवडेल, असे त्याने ठामपणे सांगितले. "तो नेहमीच गोलंदाजांचा दिवस असतो असे नाही, परंतु जर तुम्ही त्यांना खेळासाठी वेळ दिला तर तो उलटही जाऊ शकला असता. पण आज सहाव्या गोलंदाज दीपकने धावा रोखल्या आणि त्या दोन षटकांनी सामना बदलला आणि त्यांच्यावर दबाव आणला.