Hardik Pandya vs Fans: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) नवनियुक्त कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या चर्चेत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिकला संघाचा कर्णधार बनवल्यानंतर चाहते संतप्त झाले आणि आयपीएलच्या (IPL 2024) सामन्यांदरम्यान स्टेडियममध्येही पांड्या बोइंग आणि ट्रोलिंगचा बळी झाला. एमआयने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना खेळला, जिथे पांड्याला त्याच्या पूर्वीच्या घरच्या मैदानावर चाहत्यांकडून मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. मुंबईने आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावले आहेत, आता पुढील चार सामने एमआयच्या होम ग्राउंड - वानखेडे स्टेडियमवर खेळले जातील. चाहत्यांचा सध्याचा राग पाहता, मुंबई इंडियन्सने मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या सहकार्याने ट्रोलिंग थांबवण्यासाठी औपचारिक पावले उचलली आहेत.
MCA ने सुरक्षा वाढवली, हुल्लडबाजी करणाऱ्यांना होणार अटक
मिळालेल्या वृत्तानुसार एमसीएने सुरक्षा वाढवली असून सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. पांड्याला त्रास देणाऱ्या किंवा ट्रोल करणाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात घेतले जाईल आणि संभाव्यतः स्टेडियमबाहेर टाकले जाईल. राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईच्या पहिल्या घरच्या सामन्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये पांड्याच्या टीकाकारांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पाहा व्हिडिओ
May Mumbai indians fans are going to book tickets using our updates . So please ensure that you dont tease hardik pandya as he has cried in front of MCApic.twitter.com/H53Q28VG8T
— Lucky IPL Tickets (@SharmaJiKaBot) March 30, 2024
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली एमआयच्या सलग पराभवानंतर एमसीएने हे पाऊल उचलले आहे. जो कोणी हार्दिक पांड्याविरोधात टिप्पणी करेल किंवा घोषणाबाजी करेल, सुरक्षा कर्मचारी त्याला रोखतील आणि ताब्यात घेतील. (हे देखील वाचा: LSG vs PBKS, IPL 2024 Head to Head: चुरशीच्या लढतीत शिखर-राहुल आमनेसामने, जाणून घ्या आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व)
पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित
मुंबईच्या कर्णधाराने आयपीएल 2024 मध्ये एकही विजय नोंदवला नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे कारण हैदराबादच्या फलंदाजांनी 277 धावा केल्या, जी आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे.