Thisara Perera Announces International Retirement: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार फटकेबाजी आणि भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला श्रीलंकेचा (Sri Lanka) अष्टपैलू खेळाडू थिसरा परेराने (Thisara Perera) आज (03 मे 2021) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती घेतली आहे. परेराने घेतलेल्या निर्णयामुळे श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. परेराने 12 फेब्रुवारी 2016 रोजी भारताविरुद्ध रांची येथे झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात हॅट्रिक घेतली होती. यासह ब्रेट लीनंतर वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो दुसराच गोलंदाज ठरला होता.
परेराने 2009 मध्ये भारतविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर दोन वर्षांने त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने 2010 मध्ये झिम्बॉब्वे विरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला होता. परंतु, श्रीलंकाच्या मर्यादित क्रिकेट संघांचे एकवेळी नेतृत्त्व केलेल्या परेराने आगामी वनडे मालिकेपुर्वी निवृत्तीचा निर्णय घेत सर्वांना अचंबित केले आहे. ज्यामुळे श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. हे देखील वाचा- IPL 2021: कोलकाता नाइट राईडर्स मधील वरुण, संदीप यांचे COVID19 चे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह
ट्वीट-
BREAKING: Thisara Perera retires from International Cricket 🇱🇰 pic.twitter.com/cei2YrVKTa
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 3, 2021
अलीकडेच श्रीलंकेच्या घरगुती स्पर्धेत परेराने एका षटकात 6 षटकार लगावले होते. अशी कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला होता. तर, तो जगातील 9वा आणि 50 षटकांत सलग सहा षटकार ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. मेजर क्लब लिमिटेड ओव्हर लिस्ट-ए स्पर्धेत त्याने ही कामगिरी करून दाखवली आहे. एवढेच नव्हेतर, श्रीलंकेच्या लिस्ट अ मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा तो दुसरा खेळाडूही ठरला आहे.
थिसारा परेराने 6 कसोटी, 166 एकदिवसीय आणि 84 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. परेराने 6 कसोटी सामन्यांमध्ये 203 धावा केल्या असून 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 166 एकदिवसीय सामन्यात 2 हजार 338 धावा केल्या आहेत. तर, 175 बळी घेतले आहेत. याशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात परेराने 1 हजार 204 धावा आणि 51 विकेट्स घेतले आहेत.