टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना आज (ODI) गुरुवारी खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाचे कर्णधारपद अनुभवी फलंदाज शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) सोपवण्यात आले आहे. या संघात T20 विश्वचषक संघात असलेल्या खेळाडूंचा समावेश नाही. रजत पाटीदार आणि मुकेश कुमार या दोन नवीन खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी शिखर धवन पत्रकार परिषदेत म्हणाला, “संघ खूप चांगला आहे कारण या संघासोबत आम्ही यापूर्वी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध खेळलो आहोत. बरेच खेळाडू तेच आहेत, दोन नवीन खेळाडू आहेत. ते उर्जेने भरलेले आहेत आणि चांगले काम करत आहेत. मी आनंदी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही या मालिकेत चांगली कामगिरी करू.
मला फक्त स्वत:ला तंदुरुस्त ठेवायचे आहे
शिखर धवनने त्याच्या भविष्याविषयी सांगितले की, त्याला वयाच्या 36 व्या वर्षी तंदुरुस्त राहायचे आहे आणि 2023चा एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळायचा आहे. तो म्हणाला, मी खूप धन्य आहे की मला एक सुंदर करिअर मिळाले आहे. मी खरोखर कृतज्ञ आहे. जेव्हा शक्य असेल तेव्हा मी माझे ज्ञान तरुणांना देतो. आता माझ्याकडे नवीन जबाबदारी आहे पण मी आव्हानांमध्ये संधी पाहतो आणि मी त्याचा आनंद घेतो. गब्बर पुढे म्हणाला, सध्या माझे लक्ष्य 2023 विश्वचषकाकडे आहे. मला फक्त स्वत:ला तंदुरुस्त ठेवायचे आहे आणि मैदानावर राहण्यासाठी चांगली मानसिक स्थिती हवी आहे. (हे देखील वाचा: IND vs SA 1st ODI: लखनौमध्ये पुन्हा मुसळधार पाऊसाला सुरवात, टॉसला होणार उशीर)
शेखर धवनची कारकीर्द
धवनची चांगली कारकीर्द आहे. त्याने 34 कसोटीत 2315 धावा, 158 एकदिवसीय सामन्यात 6647 आणि 68 टी-20 मध्ये 1759 धावा केल्या आहेत. श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या वनडे संघांचे नेतृत्व करणारा धवन गुरुवारपासून येथे सुरू होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारणार आहे.