IND vs SL 3rd T20I: टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 30 जुलै रोजी (आज) खेळवला जाणार आहे. टीम इंडिया मालिकेत 2-0 ने पुढे आहे. भारताची नजर या मालिकेत क्लीन स्वीप करण्याकडे असेल, तर श्रीलंकेला विजयासह मालिका संपवायची आहे. टी-20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाने या मालिकेत यजमान संघाचा गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये पराभव केला आहे. श्रीलंकेने फलंदाजीतून ताकद निश्चितच दाखवली असली तरी त्याचे त्यांना विजयात रूपांतर करता आले नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मधल्या फळीतील फ्लॉप फलंदाज. (हे देखील वाचा: India to Host Men's Asia Cup 2025: 35 वर्षांनंतर... भारत 2025 मध्ये करणार आशिया कपचे आयोजन तर 2027 मध्ये 'या' देशात खेळवली जाणार स्पर्धा)
यशस्वी-बिष्णोई करत आहे चमत्कार
भारताकडून चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा यशस्वी जैस्वालवर असेल, जो मोठी धावसंख्या करू शकला नसला तरी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. रवी बिश्नोई गोलंदाजीत सातत्याने छाप पाडत आहे, तर या सामन्यात रियान परागला संधी मिळते की नाही हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. दुस-या टी-20 मध्ये त्याने चेंडूसह दमदार कामगिरी केली होती. या सामन्याच्या प्लेइंग-11मध्ये सूर्यकुमार यादव बदल करू शकतो.
श्रीलंकेकडून चांगल्या कामगिरीची आशा असेल
पथुम निसांका आणि कुसल मेंडिस सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांच्याकडून संघाला शेवटच्या सामन्यात दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. तसेच श्रीलंकेच्या गोलंदाजांनाही योग्य लाइन लेंथचा अवलंब करावा लागेल. मथिशा पाथिराना टीम इंडियाविरुद्ध मोठा अपसेट होऊ शकतो.
कशी आहे खेळपट्टी
पल्लेकेले स्टेडियमच्या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळते, पण हळूहळू त्याचा फायदा फलंदाजांनाही मिळतो. तर फिरकी गोलंदाजांनाही येथे वळण मिळत आहे. अशा स्थितीत खेळपट्टीचा घटक सामन्याच्या निकालावर फारसा परिणाम करणार नाही. भारत-श्रीलंका तिसरा सामना पावसामुळे विस्कळीत होऊ शकतो. 30 जुलै रोजी पल्लेकेलेमध्ये 55-60 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारताची अशी असू शकते संभाव्य प्लेइंग-11
संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत, रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.