IPL 2021: 'या' खेळाडूमुळे मुंबई इंडियन्सला पराभूत करणे थोडे कठीण- वीरेंद्र सेहवाग
Mumbai Indians Team, Virender Sehwag (Photo Credit: Twitter And PTI)

आयपीएलच्या (IPL 2021) पहिल्या सामन्यात पराभव पत्कारावा लागलेल्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) विजयाच्या मार्गावर परतला आहे. मुंबई इंडियन्सने गेल्या दोन्ही सामन्यात जबरदस्त कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला आहे. या कामगिरीनंतर भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) मुंबई इंडियन्सच्या संघावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. दोन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला कमी धावा रोखण्यात यश आले आहे. जोपर्यंत मुंबई इंडियन्सकडे जसप्रीस बुमराह (Jasprit Bumrah) नावचे ब्रम्हास्त्र आहे, तोपर्यंत त्याचा पराभव करणे थोडे कठी आहे, असे वीरेंद्र सेहवाग म्हणाला आहे.

कोलकाता नाईट राईडर्स आणि सनराईजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी 150 धावांचे छोटे आव्हान यशस्वीरित्या वाचवले आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात बुमराहने 4 षटकात केवळ 14 धावा देऊन एक विकेट पटकावला. सामन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा 17व्या षटकात बुमराहने फक्त 3 धावा दिल्या. ज्यामुळे मुंबई इंडियन्सला हैदराबादवर 13 धावांनी विजय मिळवण्यात यश आले आहे. मुंबईकडे छोटे आव्हान वाचवणारे आणि मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे ही आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम असल्याचे सेहवागने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, जोपर्यंत मुंबईकडे बुमराह नावाचे ब्रम्हास्त्र आहे, तोपर्यंत त्यांचा पराभव कठीण असल्याचे सेहवाग म्हणाला आहे. हे देखील वाचा- CSK vs RR, 12th Match: संजू सॅमसनने टॉस जिंकला, राजस्थान रॉयल करणार प्रथम गोलंदाजी

तसेच हैदराबाद विरुद्ध सामन्यात बुमराहसह मुंबईचे गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट आणि राहुल चहर यांनीही आपली छाप सोडली. या सामन्यात बोल्टने 3.4 षटकात 28 देऊन 3 विकेट्स पटकावल्या. तर, राहुल चहर 4 षटकात 19 धावा देऊन 3 विकेट्स मिळवले. कोलकाता विरुद्ध सामन्यातही चहरला 3 विकेटच मिळाल्या होत्या.