CSK vs RR, 12th Match: संजू सॅमसनने टॉस जिंकला, राजस्थान रॉयल करणार प्रथम गोलंदाजी

आयपीएल 2021 मधील (IPL 2021) 12व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ आज राजस्थान रॉयल्सशी (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) भिडणार आहे. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानात (Wankhede Stadium) सायंकाळी 7.30 वाजता खेळण्यात येणार आहे.

CSK vs RR, 12th Match: संजू सॅमसनने टॉस जिंकला, राजस्थान रॉयल करणार प्रथम गोलंदाजी
RR Vs CSK (Photo Credit: File Photo)

आयपीएल 2021 मधील (IPL 2021) 12व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ आज राजस्थान रॉयल्सशी (Chennai Super Kings Vs Rajasthan Royals) भिडणार आहे. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानात (Wankhede Stadium) सायंकाळी 7.30 वाजता खेळण्यात येणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. शेवटच्या सामन्यात चेन्नईने पंजाब किंग्जचा पराभव केला होता. तर, राजस्थानने दिल्ली कॅपिटल्स पराभूत केले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेले इंडियन प्रीमिअर लीगचा चौदावा हंगाम प्रेक्षकांविना खेळवण्यात आला होता. या हंगामात चेन्नई आणि आणि राजस्थानच्या संघाने प्रत्येकी 2 सामने खेळले आहेत. या दोन्ही संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यानंतर आपपल्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघाने चांगली कामगिरी बजावत विजय मिळवला आहे. हे देखील वाचा- CSK Vs RR IPL 2021 Match 12 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यातील आयपीएल सामना लाईव्ह कधी, कुठे आणि कसा पाहणार? घ्या जाणून

संघ-

चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, सॅम कुरान, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रॉबिन उथप्पा, चेतेश्वर पुजारा, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, कृष्णाप्पा गौथम, लुंगी एनगीडी, मिशेल सॅंटनर, रविश्रीनिवासन साई किशोर, हरी निशांत, एन जगदीसन, केएम आसिफ, हरिशंकर रेड्डी, भगथ वर्मा, जेसन बेहरेन्डॉर्फ

राजस्थान रॉयल्स संघ: जॉस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन सकरिया, मुस्तफिजुर रहमान, अँड्र्यू टाय, श्रेयस गोपाळ, लियाम लिव्हिंगस्टोन , केसी करियप्पा, महिपाल लोमरर, मयंक मार्कंडे, अनुज रावत, कार्तिक त्यागी, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, आकाश सिंह

(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2021 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).