RCB vs GG (Photo Credit - Twitter)

GG vs RCB 1st Match WPL 2025: महिला प्रीमियर लीग (WPL 2025) चा तिसरा हंगामाला आजपासुन सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स (RCB vs GG) यांच्यात वडोदरातील कोटाम्बी स्टेडियम, येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात आरसीबीचे नेतृत्व स्मृती मानधना करेल, तर गुजरात जायंट्सचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची अ‍ॅशले गार्डनरकडे आहे. गेल्या हंगामातील विजेता आरसीबी हंगामाची सुरुवात विजयाने करू इच्छितो. दुसरीकडे, नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली, गुजरात संघ गेल्या दोन हंगामातील निराशाजनक कामगिरी मागे सोडून हंगामाची विजयी सुरुवात करू इच्छितो.

हेड टू हेड आकडे (RCB vs GG Head to Head in WPL)

महिला प्रीमियर लीगच्या गेल्या दोन हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात 5 वेळा सामना झाला आहे. यापैकी आरसीबीने 3 तर गुजरात जायंट्सने दोन सामने जिंकले. गुजरातविरुद्ध बंगळुरूचा वरचष्मा राहिला आहे. (हे देखील वाचा: WPL 2025 Google Doodle: विमेंस प्रीमियर लीग 2025 ला सुरुवात होत आहे!, गूगल डूडलनेही साजरा केला आनंद)

किती वाजता सुरु होणार सामना?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातील महिला प्रीमियर लीग 2025 चा पहिला सामना वडोदरा येथील वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. त्याचा टॉस अर्धा तास आधी संध्याकाळी 7.00 वाजता होईल.

कुठे पाहणार लाईव्ह सामना?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातील महिला प्रीमियर लीग 2025 चा पहिला सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर टीव्हीवर लाईव्ह पाहू शकता. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकता.

दोन्ही संघाचे खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला संघ: स्मृती मानधना (कर्णधार), एस मेघना, जॉर्जिया वेअरहॅम, श्रेयंका पाटील, नुझहत परवीन (यष्टीरक्षक), सोफी डेव्हाईन, रेणुका सिंग, केटी क्रॉस, कनिका आहुजा, डॅनी व्याट, सोफी मोलिनेक्स, एकता बिष्ट, रिचा घोष, एलिस पेरी, प्रेमा रावत, जोशिता व्हीजे, राघवी बिस्ट, जगरवी पवार.

गुजरात जायंट्स महिला संघ: अ‍ॅशले गार्डनर (कर्णधार), हरलीन देओल, प्रकाशिका नाईक, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, भारती फुलमाली, लॉरा वोल्वार्ड, सायली सचरे, डॅनियल गिब्सन, मन्नत कश्यप, शबनम शकील, दयालन हेमलता, मेघना सिंग, सिमरन शेख, डिएंड्रा डॉटिन, फोबी लिचफिल्ड, तनुजा कंवर.