India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेशचे संघ रविवारी पहिल्या टी-20 सामन्यात आमनेसामने (IND vs BAN 1st T20I) येणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका पाहता बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतून शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav), हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंचा संघात समावेश आहे. भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून, या मालिकेत त्यांची कसोटी लागणार आहे.
हेड टू हेड आकडेवारी (IND vs BAN T20I Head to Head)
भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 13 सामने जिंकले आहेत, तर एकच सामना बांगलादेश संघाने जिंकला आहे. याचा अर्थ आगामी मालिका टीम इंडियासाठी फारशी आव्हानात्मक नसली तरी भारताला काळजी घ्यावी लागणार हे निश्चित आहे. क्रिकेटची खास गोष्ट म्हणजे फॉरमॅट जितका लहान असेल तितका कोणत्याही संघाला हरवण्याची क्षमता जास्त असते.
When you hear 𝗚𝗼𝗱'𝘀 𝗣𝗹𝗮𝗻 in cricket, you know it's about Rinku Singh 😎
He's got a new tattoo about it and there's more to that special story! 🎨
#TeamIndia | #INDvBAN | @rinkusingh235 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GQYbkJzBpN
— BCCI (@BCCI) October 5, 2024
भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या टी-20 सामन्यातील प्रमुख खेळाडू (Key Players)
सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, मेहदी हसन मिराज, मुस्तफिझूर रहमान, लिटन दास आणि रवी बिश्नोई असे खेळाडू आहेत जे सामन्याचा मार्ग बदलू शकतात. (हे देखील वाचा: IND vs BAN T20I Series 2024: बांगलादेशच्या कर्णधाराने भारताला दिले आव्हान, म्हणाला- कोणत्याही किंमतीत टी-20 मालिका जिंकणारच)
मिनी बॅटलमध्ये एकमेकांना अडचणीत आणणारे खेळाडू (Mini Battale)
टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा विरुद्ध बांगलादेशचा गोलंदाज तनझिम हसन शकीब यांच्यातील सामना रोमांचक होऊ शकतो. त्याचवेळी लिटन दास विरुद्ध अर्शदीप सिंग यांच्यातील संघर्षाचाही या सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. दोन्ही संघांमध्ये अनेक प्रभावी युवा खेळाडूंसह संतुलित फळी आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश पहिला सामना कधी अन् कुठे खेळवला जाणार?
भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील पहिला टी-20 सामना 6 ऑक्टोबर (रविवार) रोजी श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम, ग्वाल्हेर येथे भारतीय वेळेनुसार (IST) संध्याकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होईल.
टीव्हीवर अन् ओटीटीवर कुठे पाहणार लाइव्ह सामना?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर विनामूल्य केले जाईल. तसेच, भारतातील Sports-18 नेटवर्क टीव्ही चॅनलवर सामना प्रसारित केला जाईल.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, रियान पराग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा.
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजीद हसन, लिटन दास (विकेटकीपर), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराज, महमुदुल्ला, झकर अली, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, रिशाद हुसेन आणि तन्झिम हसन साकिब.