AUS Team (Photo Credit - X)

Australia National Cricket Team vs India National Cricket Team, Border-Gavaskar Trophy 2024-25 Live Score Update: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series)  दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड (Adelaide) येथील ॲडलेड ओव्हल (Adelaide Oval)  येथे खेळवला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 24 षटकात 5 गडी गमावून 128 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा भारत अजूनही 29 धावांनी मागे आहे. क्रीजवर ऋषभ पंत 28 धावांवर नाबाद असून नितीश कुमार रेड्डी 15 धावांवर नाबाद आहे. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. संघाने पहिले पाच विकेट झटपट गमावल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 8 षटकांत 33 धावांत 2 बळी घेतले, तर स्कॉट बोलंडने 7 षटकांत 39 धावांत 2 बळी घेतले. (हेही वाचा -  Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावातही ठरला अपयशी, अवघ्या 6 धावाकरून झाला बाद)

भारताने दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच विकेट गमावल्या. केएल राहुल (7) आणि यशस्वी जैस्वाल (24) लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले. शुभमन गिलने वेगवान 28 धावा केल्या मात्र तो मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा (6) आणि विराट कोहली (11) देखील टिकू शकले नाहीत. भारतीय फलंदाजांना तिसऱ्या दिवशी चांगली भागीदारी करून ऑस्ट्रेलियाची आघाडी संपवावी लागेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला आपल्या गोलंदाजांकडून झटपट विकेट्सची अपेक्षा असेल.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 87.3 षटकांत 337 धावा करत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 157 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 140 धावांची खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 141 चेंडूत 17 चौकार आणि चार षटकार ठोकले. ट्रॅव्हिस हेडशिवाय मार्नस लॅबुशेनने 64 धावा केल्या. दुसरीकडे, टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचप्रमाणे आर अश्विन आणि नितीश रेड्डी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी मिळून डाव सांभाळला. पहिल्या डावात संपूर्ण भारतीय संघ 44.1 षटकात 180 धावांवरच मर्यादित राहिला. युवा अष्टपैलू नितीश रेड्डी याने टीम इंडियासाठी सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. नितीश रेड्डीशिवाय केएल राहुलने 37 धावा केल्या. दुसरीकडे, अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. मिचेल स्टार्कशिवाय स्कॉट बोलँड आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले.