Coronavirus: कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रत्येकांनी डॉक्टर आणि सरकारच्या आदेशांचे पालन करावे; मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर यांचे नागरिकांना आवाहन

कोरोना विषाणूने (CoronaVirus) संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी संपूर्ण देशात संचारबंदी (Lockdown) लागू करण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी सरकारच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय, सोशल मीडियावर कोरोनाबाबत चुकीच्या माहितीचा प्रसार केला जात आहे. यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेतल्याचे समजत आहे. कोरोना विषाणूबाबत डॉक्टर आणि सरकारला योग्य माहिती आहे. यासाठीच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी देशातील प्रत्येकांनी सरकार आणि डॉक्टरांच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान भारतावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. या दरम्यान, कोणताही नागरिक घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, काही लोक सरकारच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे अनेक उदाहरण आपण पाहिले आहेत. यावर भारताचा खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी नाराजी दर्शवली आहे. सध्या देशात निर्माण झालेली परिस्थिती हातळण्यासाठी डॉक्टर आणि सरकार सज्ज आहे. यामुळे प्रत्येकांनी सरकार आणि डॉक्टरच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन सचिन तेंडुलकर यांनी नागरिकांना केले आहे. हे देखील वाचा- Lockdown In India: संचारबंदीमुळे दहावी, बारावीचा निकाल उशीराने लागण्याची शक्यता; जाणून घ्या कारण

सचिन तेंडुलकर यांचे ट्वीट- 

याआधीही सचिन तेंडुलकर यांनी सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांच्याबाबतीत संताप व्यक्त केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, कोरोनाशी लढण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू करून नागरिकांनी येत्या 21 दिवस घरात थांबण्याची विनंती केली होती. परंतु बहुतेक नागरिक या आदेशांचे पालन करत नाहीत. या कठीण परिस्थितीत सरकार्य करणे, आपले कर्तव्य आहे. यासाठी नागरिकांनी घरात बसून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालावे, अशा आशायाचे त्यांनी ट्वीट केले होते.

भारतात आतापर्यंत 650 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 42 लोक यातून बरे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 125 वर पोहचली आहे. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.