Lockdown In India: संचारबंदीमुळे दहावी, बारावीचा निकाल उशीराने लागण्याची शक्यता; जाणून घ्या कारण
Representational Image (Photo Credits: Facebook)

कोरोना विषाणुने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूची लागण होऊन आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 लाखांहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक देशांनी संचारबंदीचा ( Lockdown) पर्याय निवडला आहे. भारतातही संचारबंदी लागू केली असून याचा फटका दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बसू शकतो. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका घरीच तपासण्याते निर्देश देण्यात आले होते. मात्र, याआधीच देशात संचारबंदी लागू झाल्याने इयत्ता दहावीच्या लाखो उत्तरपत्रिका शाळेतच अडकून पडल्या आहेत. याशिवाय काही शिक्षक गावी गेल्यामुळे बारावीच्याही उत्तरपत्रिका तपासणीसाठी विलंब होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत संचारबंदी उठल्याशिवाय कोणतेही शिक्षक शाळेत जाऊ शकत नाहीत. यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशीराने लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, बारावीचा निकाल गेल्यावर्षी 28 मे लागला होता, तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणे अपेक्षित असते. मात्र आता पेपर तपासणीसाठी शिक्षकांना विलंब होणार आहे. तसेच हे पेपर तपासल्यानंतर नियामककडे जातात आणि त्यानंतर गुणपत्रिका तयार केली जाते. त्यानंतरच निकाल लागतो, अशी प्रक्रिया असल्याने निकाल पुढे जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती लोकमतने दिली आहे. यावर्षी दहावीच्या परिक्षेला राज्यातून एकूण 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते. तर, बारावीच्या परीक्षा देण्यासाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते. यात मुलांची संख्या 8 लाख 43 हजार 553 तर, 6 लाख 61 हजार 325 मुलींचा यात समावेश आहे. राज्यात एकून 3036 परीक्षा केंद्रावर आजपासून परीक्षेला सुरूवात होणार आहे. हे देखील वाचा- Coronavirus: लॉकडाउन असताना घराबाहेर पडला, सख्ख्या भावाने भावाचा मुडदा पाडला, मंबई येथील धक्कादायक घटना

देशात संचारंबदी लागू झाल्यामुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपरची त्यानंतरच जाहीर केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, संचारबंदी लागू झाल्यानंतर शिक्षकांना प्रवास करणे अवघड झाले आहे. दरम्यान, सर्वच विषयाचे उत्तरपत्रिका केंद्रावर अडकून पडली आहे. देशात संचारबंदी लागू होण्यापूर्वीच शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी तपासण्यासाठी दिल्या असते, तर कदाचीत दहावी, बारावीचा निकाल वेळेत जाहीर झाला असता, अशी प्रतिक्रिया अंधेरीच्या हंसराज मोररारजी हायस्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली आहे.