World Test Championship: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची लढाई अनेक संघांमध्ये तीव्र झाली आहे. सुधारित गुणतालिकेनुसार ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, श्रीलंका तिसऱ्या, भारत चौथ्या आणि पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनलबाबत (World Test Championship) मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अद्याप वेळापत्रक जाहीर केले नसले तरी, Cricbuzz च्या बातमीनुसार - तात्पुरते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 7 ते 11 जून या कालावधीत होणार आहे. हवामानामुळे खेळ पूर्ण करण्यासाठी राखीव दिवसाचीही तरतूद असेल. ठिकाण आधीच जाहीर झाले आहे. हा सामना ओव्हलवर होणार आहे.
आयपीएल येवु शकते अंतिम तारखेजवळ
जूनच्या पहिल्या आठवड्यात हे घडले तर ही तारीख इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) फायनलच्या जवळ येऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएलच्या पूर्ण तारखांना अंतिम रूप देत असल्याचे मानले जाते परंतु ते 4 जून किंवा 28 मे रोजी संपू शकते, दोन्ही तारखा भारतीय संघाच्या सोयीसाठी खूप जवळ आहेत. जर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र ठरला, तर बीसीसीआय, राष्ट्रीय निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाला या तारखांशी जुळवून घ्यावे लागेल. (हे देखील वाचा: पाकिस्तानचा पराभवानंतर WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल; Team India ला फायदा, घ्या जाणून)
टीम इंडिया पोहोचू शकते फायनलमध्ये
भारतीय संघाला अजून सहा कसोटी खेळायच्या आहेत. ते या महिन्याच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध दोन मायदेशी सामने आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार मायदेशी सामने खेळणार आहेत. यामध्ये टीम इंडिया जिंकली तर टॉप टू मध्ये पोहोचू शकते. आयपीएल 31 मार्च किंवा 1 एप्रिलपासून सुरू होऊ शकते, असे बोर्डाने त्यांना सूचित केले आहे. गुजरात टायटन्स गतविजेता असल्याने आयपीएल अहमदाबादमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.