Team India (Photo Credit - X)

ICC Champions Trophy 2025 Semi-Final: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. टीम इंडियाने आपल्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आता मोठा प्रश्न असा आहे की सेमीफायनलमध्ये टीम इंडिया (Team India) कोणत्या संघाशी सामना करेल. आणि इंग्लंड (AFG vs ENG) यांच्यातील सामन्यानंतर आता एक नवीन समीकरण तयार होताना दिसत आहे. अफगाणिस्तानकडून पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. (हे देखील वाचा: Team India Stats In Champions Trophy Semi Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची कशी आहे कामगिरी, 'मेन इन ब्लू'ची पाहा येथे आकडेवारी)

गट-ब मध्ये उपांत्य फेरीची शर्यत आता खूपच रोमांचक

ग्रुप अ मधून टीम इंडिया आणि न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, ग्रुप बी मध्ये उपांत्य फेरीची शर्यत आता खूपच रोमांचक बनली आहे. सेमीफायनलसाठी ग्रुप बी मध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत सुरू आहे. सध्या, पॉइंट्स टेबलमध्ये, दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आणि अफगाणिस्तान संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

अफगाणिस्तानचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाशी

अफगाणिस्तानचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. जर अफगाण संघाने हा सामना जिंकला तर त्यांचे 4 गुण होतील आणि संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेचा पुढचा सामना इंग्लंडशी आहे, जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला तर त्यांचे 5 गुण होतील, यासह संघ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर राहून सेमीफायनलसाठी पात्र ठरेल.

भारत उपांत्य फेरीत कोणत्या संघाशी खेळू शकतो?

टीम इंडियाचा शेवटचा लीग सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणार आहे. जर रोहित आणि कंपनीने हा सामना जिंकला तर ते पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचतील. त्यानंतर टीम इंडिया ग्रुप-ब च्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघासोबत सेमीफायनल सामना खेळेल. आता ग्रुप-ब च्या पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ दुसऱ्या स्थानावर राहतो हे पाहणे बाकी आहे.