ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत ऐतिहसिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय खेळाडूंवर लाखो रुपयाच्या बक्षिसांची BCCI कडून बरसात
Indian team poses with the trophy after winning Test series against Australia. (Photo: @BCCI/Twitter)

सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघाने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका (Australia Test Series ) जिंकण्याची किमया घडवून आणली आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी सरशी घेतली आणि सिडनी कसोटी पावसामुळे ड्रॉ झाल्याने कसोटी मालिका खिशात घालण्यात भारताला यश मिळालं. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असताना आता बक्षीसांची बरसात देखील होण्यास सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर अनुष्काकडून विराटला खास भेट

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकून आनंद सेलिब्रेट करत असलेल्या टीम इंडियाचा आनंद आता द्विगुणित झाला आहे. कारण आता भारतीय संघाला बक्षीस म्हणून BCCI कडून  60 लाखांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक भारतीय खेळाडूला 15 लाख रूपये बक्षीसाच्या स्वरूपात मिळणार आहे. राखीव खेळाडूंना साडेसात लाख आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि इतर प्रशिक्षक सदस्यांना प्रत्येकी 25 लाख रूपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. पहा भारतीय संघाचं सेलिब्रेशन 

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारत 12 जानेवारीपासून तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारत न्युझिलंड दौर्‍यावर आहे. न्युझिलंड दौर्‍यामध्ये भारतीय संघ 5 वनडे आणि 3 टी20 सामने खेळणार आहे.