बियांका एंड्रेस्कू (Photo Credit: @rogerscup/Twitter)

अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विलियम्स (Serena Williams) हिने यंदाच्या रॉजर्स कपच्या (Rogers Cup) फायनलमधून माघार घेतली आहे. आई झाल्यापासून सेरेना तिच्या पहिल्या पदकाच्या शोधत आहे. 2017 च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 23 वे ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवल्यानंतर विलियम्स प्रथम पदकाच्या शोधत आहे. आई झाल्यापासून तिने अद्याप एकही पदक जिंकले नाही. कॅनडाच्या बियांका एंड्रेस्कू (Bianca Andreescu) हिच्या विरुद्ध फायनलमध्ये 1-3 ने पिछाडीवर होती जेव्हा हिने सामन्यातून माघार घेतली. 1969 नंतर पहिल्यांदा टोरोंटो ओपन जिंकणारी एंड्रेस्कू ही पाहिली कॅनेडियन महिला खेळाडू आहे.

19 वर्षीय एंड्रेस्कू सर्व्हिस ब्रेकसह 3-1 च्या आघाडीवर होती. जेव्हा तिला सेरेना पुढे खेळू शकणार नसल्याचे समजले. तिने वैद्यकीय टाइमआऊट घेण्याची विनंती केली. पण त्यानंतर एका मिनिटातच पंचाने जाहीर केले की ती सामन्यातून माघार घेत आहे. यावेळी सेरेना खूप भावुक झाल्याची दिसली. त्यानंतर अ‍ॅन्ड्रीस्कू तिच्याजवळ येत तिने प्रोत्साहन आणि एक सांत्वनिक मिठी मारली. ऑन-कोर्ट मायक्रोफोनने विल्यम्सच्या पाठीच्या अंगाच्या भागाचा उल्लेख पकडला आणि मागच्या बाजूला दुखापत झाल्यामुळे तिने माघार घेत असल्याचे अधिकृत कारण समोर आले.

"मी काही रडकी नाही, परंतु, धन्यवाद लोकांनो," माघार घेतल्यावर सेरेनाने चाहत्यांना सांगितले. "मला माफ करा आज मी हे करू शकले नाही. मी प्रयत्न केला पण मी ते करू शकले नाही."

लेक ऑलिम्पिया हिच्या जन्मानंतर स्पर्धेत परत आल्यापासून ती तीन ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पोहोचली आहे. पण, ऑस्ट्रेलियाची (Australia) महान महिला टेनिसपटू मार्गारेट कोर्ट (Margaret Court) हिच्या 24 पदकांच्या विक्रमाची बरोबरी तिला अजून साधता आली नाही.