भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची (IND vs WI) कसोटी मालिका 1-0 ने जिंकली होती. आता कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेत (ODI Series 2023) चांगली कामगिरी करण्यावर टीम इंडियाची नजर असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारतीय संघात 2 यष्टीरक्षकांना स्थान मिळाले आहे. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. भारतीय संघात इशान किशन (Ishan Kishan) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांना यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली आहे. सॅमसनने जुलै 2021 मध्ये टीम इंडियासाठी एकदिवसीय पदार्पण केले, परंतु खराब फॉर्ममुळे तो टीम इंडियामध्ये (Team India) आपले स्थान निश्चित करू शकला नाही.
संजू सॅमसनला मिळू शकते संधी
नोव्हेंबर 2022 रोजी त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. आता पुन्हा एकदा त्याला टीम इंडियामध्ये आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली आहे. जर त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर चांगली कामगिरी केली तर केएल राहुल आणि ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने त्याच्यासाठी आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे दरवाजे उघडू शकतात. सॅमसनने भारतीय संघासाठी 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 330 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 7 झेल घेतले आणि 2 स्टंपिंगही केले.
इशान किशनने झळकावले आहे द्विशतक
इशान किशन उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने धडाकेबाज पद्धतीने अर्धशतक झळकावले. त्याने 33 चेंडूत 50 धावा केल्या. वेस्ट इंडिज दौऱ्यात इशान यष्टिरक्षणाचा प्रबळ दावेदार आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 14 सामन्यांत 510 धावा केल्या आहेत, ज्यात एका द्विशतकाचा समावेश आहे. याशिवाय त्याने 2 स्टंपिंग आणि 5 झेल घेतले आहेत. (हे देखील वाचा: IND vs WI 1st ODI 2023: कसोटीनंतर आता टीम इंडियाचा वनडेमध्ये दिसणार जलवा, वाचा मालिकेशी संबंधित संपुर्ण माहिती)
इंडिजविरुद्धची मालिका भारतासाठी महत्वाची
कर्णधार रोहित शर्मा पहिल्या वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये इशान किशन आणि संजू सॅमसन या दोघांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर यष्टीरक्षकाची जबाबदारी संजूकडे सोपवली जाऊ शकते. हे दोन्ही खेळाडू यापूर्वी मधल्या फळीत खेळले आहेत. एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. कर्णधार रोहित शर्मा या मालिकेतून योग्य संघ संयोजन शोधण्याचा प्रयत्न करेल.