भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही मालिका 27 जुलै 2023 पासून सुरू होणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. संघाला विजय मिळवून आपली तयारी चमकदार करायची आहे, तर दुसरीकडे कसोटी मालिका गमावल्यानंतर वेस्ट इंडिजला त्यात पुनरागमन करायचे आहे. 27 जुलै रोजी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याने मालिकेची सुरुवात होईल. यानंतर दुसरा वनडे सामना 29 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हे दोन्ही सामने बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर खेळवले जातील. अखेर या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना 1 ऑगस्ट रोजी त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जाईल.
कोण कोणावर भारी?
यजमान वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आणि भारत यांच्यात आतापर्यंत एकूण 42 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 19 जिंकले आहेत आणि 20 गमावले आहेत. शेवटच्या वेळी जुलै 2022 मध्ये, भारताने क्वीन्स पार्क ओव्हल येथे यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय सामना खेळला होता. ज्यामध्ये टीम इंडियाचा विजय झाला.
कधी आणि कुठे पाहणार सामना लाइव्ह?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका डीडी स्पोर्ट्सवर टीव्हीवर पाहता येईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. हा सामना मोबाईलवर जिओ सिनेमावर पाहता येईल. (हे देखील वाचा: Harmanpreet Kaur Suspended for Two Matches: आयसीसी आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौरवर कारवाई; दोन सामन्यांवर बंदी)
पहा दोन्ही संघांचे पथक
भारत एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज एकदिवसीय संघ: शाई होप (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), अलिक अथानाज, यानिक कॅरिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जॅडन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशाने थॉमस.