टीम इंडिया (Photo Credit: Getty)

भारतीय (India) अंडर-19 क्रिकेट संघाने श्रीलंकेत खेळल्या जाणार्‍या आशिया कपच्या (Asia Cup) अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताचा यजमान श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध सामना होता परंतु पावसामुळे एकही चेंडू फेकता आला नाही आणि ग्रुप सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिल्यामुळे भारताला अंतिम सामन्यात स्थान मिळाले. भारताने सातव्यांदा फायनलची फेरी गाठली आहे. गुरुवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळलेला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. या सामन्यात टॉस होऊ शकला नाही. भारताने त्यांचे गटातील सर्व सामने जिंकून सेमीफायनल फेरीत प्रवेश केला, त्यामुळे त्यांना आपोआप अंतिम सामन्यात स्थान मिळाले. टीम इंडियाचा अंतिम सामना अफगाणिस्तान (Afghanistan) संघाशी 14 सप्टेंबर रोजी होईल. अफगाणिस्तान संघाचा बांग्लादेशविरुद्ध सेमीफायनल सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला.

आशिया चषक गटातील सामन्यात भारताने त्यांचे तीनही सामने जिंकले. पहिल्या सामन्यात भारताने कुवैतला सात गडी राखून पराभूत केले, तर दुसर्‍या सामन्यात पाकिस्तानवर 60 धावांनी विजय मिळविला. अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध भारताने तीन गडी राखून विजय मिळविला. लीग सामन्यात भारत अव्वल तर श्रीलंकेने त्यांच्या गटात दुसरे स्थान पटकावले. प्रथम स्थानावर आल्यामुळे भारताला पुढे जाण्याची संधी मिळाली.

टीम इंडियाने या स्पर्धेची अंतिम फेरी सातव्यांदा जिंकली आहे. अंडर-19 आशिया कप भारताने सर्वाधिक सहा वेळा जिंकला आहे. मागील वेळी भारत सेमीफायनल फेरी गाठण्यात अपयशी ठरला.