सध्या भारतात सर्वत्र वर्ल्डकपचे (ICC Cricket World Cup 2019) वारे वाहत आहे. भारत आता आपला पुढचा सामना, 30 जून रोजी इंग्लंडसोबत खेळणार आहे. या सामन्यासाठी भारताचा संघ (Indian Cricket Team) निळ्या जर्सी (Blue Jersey) सोबतच भगव्या जर्सीमध्ये (Orange Jersey) खेळणार असल्याचे वृत्त होते. याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्यावर अखेर बीसीसीआयने भगव्या रंगावरच शिक्कामोर्तब केले आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत पोशाख प्रायोजक, नाईकी (Nike) यांनीदेखील रविवारी इंग्लंडविरुद्ध आयसीसी विश्वचषक सामन्यासाठी भारतीय संघ नारंगी आणि निळ्या जर्सीमध्ये खेळत असल्याची पुष्टी दिली आहे.
The new India 'away' strip from Nike. I like it! Thanks @gauravkalra75! pic.twitter.com/GXPZiFHhEt
— Joy Bhattacharjya (@joybhattacharj) June 28, 2019
कंपनीकडून या जर्सीचे डिझाईनदेखील सादर केले गेले आहे. या जर्सीमध्ये नारंगी आणि निळ्या रंगाचाही वापर करण्यात आला आहे. यजमान इंग्लंड संघाच्या जर्सीचा रंगही निळा असल्याने भारत 30 जून रोजी बर्मिंघममध्ये (Birmingham) पहिल्यांदाच 'भगव्या जर्सी'मध्ये इंग्लंडशी खेळणार आहे. गेली इतकी वर्षे भारतीय संघ निळ्या जर्सीमध्ये खेळत आला आहे. यावर्षी आयसीसीने रंग निवडीचे काही पर्याय दिले होते, त्यानंतर नारंगी रानड निवडण्यात आला.
(हेही वाचा: भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवर अबू आझमी यांचा आक्षेप; सरकार देशाचे 'भगवाकरण' करत असल्याचा आमदार एमए खान यांचा आरोप)
याआधी या जर्सीची अनेक छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल होत होती, मात्र आता बीसीसीआय आणि नाईकी यांनी या जर्सीच्या डिझाईनला अधिकृत पुष्टी दिली आहे. दरम्यान सध्या वर्ल्डकपमध्ये 10 संघांनी भाग घेतला आहे, यातील 8 संघ हे दोन रंगाच्या जर्सीमध्ये खेळत आहेत. त्यात आता भारतीय संघही सामील होईल.