आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) संपल्यानंतर 23 नोव्हेंबरपासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेकडे टीम इंडियाच्या 2024 टी-20 विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला या मालिकेसह एकूण तीन टी-20 मालिका खेळायच्या आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या टी-20 मालिकेसाठी संघाची कमान स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 1st T20 2023: भारताच्या अनेक खेळाडूंनी टी-20 मध्ये केले आहे नेतृत्व, पहिल्या टी-20 मध्ये नाणेफेक होताच सूर्या या यादीत करेल प्रवेश)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघासारखाच आहे. या संघात दुखापतीमुळे विश्वचषक न खेळलेले सूर्यकुमार कुमार आणि अक्षर पटेल यांचे पुनरागमन झाले आहे. या टी-20 मालिकेत सर्वांच्या नजरा ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि यशस्वी जैस्वाल यांच्यावर असतील. हे तेजस्वी खेळाडू 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना 23 नोव्हेंबरला विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया या दिग्गज खेळाडूंसोबत मैदानात उतरू शकते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 साठी टीम इंडियाची संभाव्य इलेव्हन: यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये डावाची सुरुवात करू शकतात. तर यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल.
यानंतर मोठे फटके मारण्यात माहीर असलेला टिळक वर्मा पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. आवश्यकतेनुसार टिळक वर्माही अष्टपैलूची भूमिका बजावू शकतात. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत रिंकू सिंगला फिनिशरच्या भूमिकेत फिट होण्याची सुवर्णसंधी असेल. रिंकू सिंगला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते. गेल्या आयपीएल हंगामात आपल्या झंझावाती फलंदाजीने सर्वांना प्रभावित केल्यानंतर, रिंकू सिंगने आयर्लंड दौऱ्यावर टी-20 मालिकेतही छाप सोडली.
त्याचबरोबर अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी वॉशिंग्टन सुंदरच्या हाती असेल. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखाली प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार यांच्याकडे दिली जाऊ शकते.
पहिल्या टी-20 साठी टीम इंडियाची संभाव्य इलेव्हन: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, प्रसीद्ध कृष्णा, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया टी-2- मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, श्रेयस अय्यर (चौथ्या आणि पाचव्या टी-20 साठी).