India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात, भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी-20 सामन्यांव्यतिरिक्त 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. बीसीसीआय निवड समिती 11 जानेवारी रोजी भारतीय संघाची निवड करेल. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अनेक मोठ्या नावांना विश्रांती दिली जाऊ शकते असे मानले जात आहे. तसेच संघात अनेक तरुण खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो.
भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल?
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात अभिषेक शर्माच्या जागी रियान परागचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. याशिवाय रमणदीप सिंगच्या जागी शिवम दुबेला संधी मिळू शकते. याशिवाय अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि वरुण चक्रवर्ती यांची निवड जवळजवळ निश्चित मानली जात आहे. या संघात इशान किशन व्यतिरिक्त, संजू सॅमसन हा यष्टीरक्षक पदासाठी दावेदार आहे. तसेच, ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन यांचे दावे मजबूत मानले जातात. त्याचबरोबर, भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला विश्रांती दिली जाऊ शकते असे मानले जात आहे.
हे देखील वाचा: IND vs ENG ODI Series 2025: काय सांगता! गेल्या 40 वर्षांपासून इंग्लंड संघाने भारतात एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही, पाहा आकडेवारी
या वेगवान गोलंदाजांची निवड जवळजवळ निश्चित...
या भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग, आवेश खान आणि यश दयाल यांची निवड जवळजवळ निश्चित आहे. याशिवाय, मयंक यादव, विजयकुमार व्यासक आणि हर्षित राणा यांची निवड फिटनेसवर अवलंबून असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कोलकाता व्यतिरिक्त, भारत-इंग्लंड टी-20 मालिकेचे सामने चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे खेळवले जातील. यानंतर, दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल.