
मुंबई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना (IND vs ENG 5th T20I 2025) आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium, Mumbai) खेळवला गेला. पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 247 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ फक्त 97 धावांवर बाद झाला. (हे देखील वाचा: Abhishek Sharma New Record: अभिषेक शर्मा ठरला सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू, रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला)
टी-20 मधील दुसरा सर्वोच्च विजय (पूर्ण सदस्य)
168 धावा भारत विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद, 2023
150 धावा भारत विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2025
143 धावा पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, कराची, 2018
143 धावा भारत विरुद्ध आयर्लंड, डब्लिन, 2018
137 धावा इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, बासेटेरे, 2019
135 धावा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोबर्ग 2024
𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎!
Congratulations #TeamIndia on winning the #INDvENG T20I series 4️⃣-1️⃣ 👏👏 🏆@IDFCFIRSTBank pic.twitter.com/ucvFjSAVoK
— BCCI (@BCCI) February 2, 2025
भारताचे सर्वाधिक पॉवरप्ले स्कोअर (टी२० मध्ये)
95/1 विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2025
82/2 विरुद्ध स्कॉटलंड, दुबई, 2021
82/1 विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, 2024
78/2 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोबर्ग, 2018
टी-20 मध्ये चेंडूंच्या बाबतीत सर्वात जलद शतक (पूर्ण सदस्य)
35 चेंडू डेव्हिड मिलर विरुद्ध बांगलादेश, पॉचेफस्ट्रूम, 2017
35 चेंडूत रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर, 2017
37 चेंडू अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2025
39 चेंडू जॉन्सन चार्ल्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, 2023
40 चेंडू संजू सॅमसन विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, 2024
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार
13 षटकार अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2025
10 षटकार रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर, 2017
10 षटकार संजू सॅमसन विरुद्ध दक्षिण आफ्रिका, डर्बन, 2024
10 षटकार तिलक वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोबर्ग, 2024
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारताचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
135 अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, 2025
126* शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद, 2023
123* ऋतुराज गायकवाड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गुवाहाटी, 2023
122* विराट कोहली विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई, 2022
121* रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान, बेंगळुरू, 2024