सध्या भारतीय संघ (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 2 तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्याला (India Tour South Africa) सुरुवात करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. आता यासाठी बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली आहे. (हे देखील वाचा: Team India Head Coach Update: राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहणार का? आपल्या कराराबाबत केले मोठे विधान (Watch Video)

तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

3 वनडेसाठी भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार) (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी*, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसीध कृष्णा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)