T20 World Cup 2024 Schedule: विश्वचषकानंतर चाहते टी-20 विश्वचषकाची (T20 World Cup 2024) आतुरतेने वाट पाहत आहेत. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेला अजून काही महिने बाकी आहेत. दरम्यान, आयसीसीने टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक (T20 World Cup 2024 Schedule) नुकतेच जाहीर केले आहे. विश्वचषकाची सुरुवात 1 जूनपासुन होणार आहे. तर पहिला सामना यूएसए विरुद्ध कॅनडामध्ये (USA vs CAN) खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला (Team India) अ गटात स्थान मिळाले असुन भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्धच्या (IND vs IRE) मोहिमेला सुरुवात करणार आहे. आणि त्यानंतर विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सर्वात मोठा महामुकाबला खेळवला जाणार आहे (हे देखील वाचा: ICC Men’s Cricketer of the Year साठी नामांकित खेळाडूंची घोषणा, Virat Kohli, Ravindra Jadeja, Pat Cummins आणि Travis Head मध्ये होणार टक्कर)
9 जून रोजी होणार IND vs PAK सामना
आयसीसीच्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीची क्रिकेट चाहते नेहमीच वाट पाहत असतात. अलीकडेच विश्वचषक 2023 च्या साखळी फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते. यावेळी ब्लू संघाने ग्रीन संघाचा पराभव केला होता. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढत होणार आहे. यावेळी ही रोमांचक स्पर्धा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात 9 जूनला पाहायला मिळणार आहे.
India to face Pakistan in New York on June 9 in the ICC T20 World Cup 2024 pic.twitter.com/XHzh7ABO6P
— Press Trust of India (@PTI_News) January 5, 2024
कोणता संघ कोणत्या गटात?
अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका.
ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान.
क गट- न्यूझीलंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, युगांडा, पीएनजी.
ड गट- दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड, श्रीलंका, नेपाळ.
Groups of T20 World Cup 2024. 🏆 pic.twitter.com/If2Dyo6GTK
— Johns. (@CricCrazyJohns) January 5, 2024
टी-20 विश्वचषकातील भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून- भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क
9 जून- भारत विरुद्ध पाकिस्तान, न्यूयॉर्क
12 जून- भारत विरुद्ध अमेरिका, न्यूयॉर्क
15 जून- भारत विरुद्ध कॅनडा, फ्लोरिडा
कसे असणार स्पर्धेचे स्वरूप ?
या स्पर्धेच्या फॉरमॅटबद्दल बोलायचे झाले तर सर्व संघ ग्रुप स्टेजमध्ये 4-4 सामने खेळतील. यानंतर, प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. सुपर 8 च्या या बाद फेरीनंतर चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील दोन विजयी संघ अंतिम फेरीत आमनेसामने येतील. 26 आणि 27 जून रोजी उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे.
26 जून - पहिला उपांत्य फेरी - गयाना
27 जून - दुसरी उपांत्य फेरी - त्रिनिदाद
29 जून - अंतिम - बार्बाडोस