T20 World Cup 2021: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या सेमीफायनल पूर्वी माजी भारतीय क्रिकेटरची भविष्यवाणी, ‘या’ संघाला म्हटले विजेते
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनल (Photo Credit: PTI)

आयसीसी टी-20 विश्वचषकमध्ये (ICC T20 World Cup) आज पहिला उपांत्य सामना इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात होणार आहे. अबू धाबी (Abu Dhabi) येथे हा सामना रंगणार आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचकाची भूमिका बजावत असलेल्या आकाश चोप्राने (Aakash Chopra) या सामन्याबाबत मोठा अंदाज वर्तवला आहे. आकाश म्हणाला की, या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर न्यूझीलंडच्या सलामीवीरांपेक्षा जास्त धावा करेल. याशिवाय चोप्रा यांनी किवी संघापेक्षा इंग्लंडच्या फलंदाजांनी अधिक चौकारांचा अंदाज वर्तवला. सुपर 12 टप्प्यात इंग्लंडने त्यांच्या गटात अव्वल स्थान पटकावले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर न्यूझीलंडला केवळ सुपर 12 टप्प्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर त्यांनी सलग चार सामने जिंकून गटात दुसरा क्रमांक मिळवला होता. (T20 World Cup 2021: भारतात IPL वरून गोंधळ, पण न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला – ‘आम्हाला WC मध्ये त्याचा फायदा झाला’)

त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर करताना आकाश म्हणाला, “इंग्लंड या सामन्यात अधिक चौकार आणि षटकार मारेल. कारण सामन्याचा निकाल चौकार आणि षटकारांवरच लागणार आहे. तुमच्याकडे सुपर ओव्हरनंतर पुन्हा सुपर ओव्हर होईल, परंतु हा सामना कदाचित तितका पुढे जाणार नाही. जो संघ जास्त चौकार आणि षटकार मारतो तो निश्चितच इंग्लंड आहे आणि इंग्लंडचे फलंदाज किवी संघाविरुद्ध अधिक फटके मारेल असे मला वाटते.” आकाश म्हणाला, “केन विल्यमसन आणि डेव्हन कॉनवे इंग्लंडविरुद्ध मिळून 60 हून अधिक धावा करतील. दोघेही न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीचा कणा आहेत. केन फलंदाजी करू शकतो आणि कॉनवे खूप चांगला खेळत आहे आणि खूप पुढे जाईल.” या सर्व अंदाजांनंतर आकाशने सर्वात महत्वाची भविष्यवाणी केली आणि हा सामना कोण जिंकेल आणि अंतिम फेरीत प्रवेश करेल हे देखील सांगितले. आकाशने इथे इंग्लंडचे नाव घेतले.

शेवटच्या वेळी जेव्हा दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेत विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झाला होता जिथे त्यांना छोट्या फरकाने सामना गमवावा लागला होता. इंग्लंड संघ क्रिकेटचा आक्रमक ब्रँड म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये मोठ्या फटक्यांवर जास्त भर दिला जातो. दरम्यान आजच्या सामन्यात इंग्लंड संघ फेव्हरिट म्हणून नक्कीच मैदानात उतरेल. तथापि, जेसन रॉयच्या अनुपस्थितीमुळे त्यांना थोडासा अडथळा येऊ शकतो आणि विल्यमसनच्या नेतृत्वातील संघ त्याचा फायदा घेऊ शकतो.